पुणे दि १३ जुलै (चेकमेट टाईम्स): पर्यटकांना रपेट मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घोड्यांना काटेरी लगाम घालण्याचा वापर पर्यटनस्थळांवर करण्यात येत असल्याचे उघडकीस आल्यानंतर ‘पेटा’ (पीपल फॅार द एथिकल ट्रिटमेंट ऑफ ॲनिमल्स) संस्था तसेच पोलिसांकडून पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान, कोल्हापुरातील रंकाळा तलाव परिसरात कारवाई करण्यात आली. घोडेवाल्यांकडून १०४ काटेरी लगाम जप्त करण्यात आले. ‘पेटा’कडून घोडेवाल्यांना साधे लगाम देण्यात आले.
घोड्यांना काटेरी लगाम घालण्यास
शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. कोल्हापुरातील रंकाळा तलाव, पाचगणी, महाबळेश्वर
परिसरातील घोड्यांवरून पर्यटकांना रपेट मारणारे व्यावसायिक काटेरी लगामचा (स्पाईक
बिट) वापर करत असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘पेटा’च्या नताशा इत्तिवेराह, सांगलीतील
प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचे सुनील हवालदार आणि स्वयंसेवकांनी या प्रकाराची
माहिती पोलीस तसेच प्रादेशिक पशूसंवर्धन सहआयुक्त डॅा. पी. डी. कांबळे (मुंबई
विभाग), पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॅा.
शीतलकुमार मुकणे,
पशूधन विकास अधिकारी प्रियंका
जोपूळकर (पुणे),
डॅा. वाय. बी. पठाण (कोल्हापूर)
डॅा. रत्नाकर काळे (रायगड ) यांना दिली.
त्यानंतर स्वयंसेवकांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान, रंकाळा तलाव परिसरातील
घोड्यांना वापरण्यात येणारे काटेरी लगाम काढून टाकले. या कारवाईत एकूण १०४ काटेरी
लगाम जप्त करण्यात आले. घोड्यांचा मालकांना विनामूल्य साधे लगाम वापरण्यास देण्यात
आल्याचे नताशा इत्तेवेराह आणि सुनील हवालदार यांनी सांगितले. आसाम, बिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, उत्तरप्रदेशासह अनेक
राज्यात काटेरी लगामाचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. काटेरी लगाम
तयार करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई होणे गरजेचे आहे. काटेरी लगामचा वापर करण्यास
देशपातळीवर बंदी घालणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत
आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes