पुणे दि.१४ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : पुण्यात अहमदनगर येथील एक टोळके हॉटेमध्ये
जेवणसाठी आले. चमचमीत जेवणाची ऑर्डर त्यांनी दिली. अन्नावर पोटभर ताव मारल्यावर
शेवटी बीलही आणून दिले. यामुळे जेवणाचा आनंद खराब केला म्हणत या टोळक्याने चक्क
वेटरचेच अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना कात्रज परिसरात रानमाळ हॉटेल
येथे घडली आहे. याप्रकरणी पोलीसांनी पाच आरोपींना जेजुरी येथून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी योगेश सर्जेराव
पवार (वय २८),
रविंद्र सखाहारी कानडे (वय ४१), रुपेश अशोक वाडेकर (वय ३८), ओंकार जालिंदर बेंद्रे (वय ३२) व नितीन अशोक वाडेकर (३२, सर्व रा. शिर्डी, ता.राहता, अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
याबाबत भारती विद्यापीठ
पोलीस ठाण्यात शारदा निलेश भिलारे (वय ३८,रा.पुणे)
यांनी पोलीसांकडे आरोपीं विरोधात तक्रार दाखल केली आहे. ११ जुलै रोजी रात्री दहा
वाजण्याच्या सुमारास संबंधित आरोपी कात्रज परिसरातील नवीन बोगद्याजवळ हॉटेल रानमाळ
याठिकाणी जेवणास आले होते. त्यांचे हॉटेल मधील जेवण जेवून संपल्यानंतर त्यांना
जेवणाचे बील हॉटेलचा वेटर किशोर कोईराला याने देऊन पैशांची मागणी केली. त्यावेळी
जेवणाचे बील दिल्याने टोळक्यास राग येऊन त्यांनी किशोर याला जबरदस्तीने उचलून
मारहाण करुन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या कारमध्ये (एमएच १६ बीएच
६४५६) जबरदस्तीने टाकले. यावेळी त्याला मारण्याची धमकीही दिली.
आरोपी हे जेजुरी जवळ दोरगेवाडी येथे डोंगरात लपून
बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी
पोलीसांचे एक पथक पाठवून आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. ही कामगिरी पोलीस
उपआयुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वपोनि जग्ननाथ कळसकर, पोनि (गुन्हे)
संगीता यादव, पोनि (गुन्हे) विजय पुराणिक यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे
अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस.शिंदे, पोउपनिरी धीरज गुप्ता, अंमलदार रविंद्र चिप्पा,तुळशीराम टेंभुर्णे, गणेश भोसले, मंगेश बोराडे. अवधुत जमदाडे, मितेश चोरमोले, आशिष गायकवाड, नरेंद्र महांगरे, अभिनय चौधरी, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, विक्रम सावंत निलेश
खैरमाडे यांच्या पथकाने केली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली
काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84