Type Here to Get Search Results !

अजून किती अच्छे दिन हवेत? आजपासून दही, पीठ, पनीरसह अनेक वस्तू महाग होणार, हॉस्पिटलचा खर्चही वाढणार

 


पुणेदि.१ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स):महागाईच्या बोजाखाली दबलेल्या नागरिकांना आजपासून आणखी झटका बसणार आहे. अनेक रोजच्या वापराच्या वस्तू आजपासून महाग होणार आहेत. जीएसटी परिषदेच्या कर बदलाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर आजपासून अनेक खाद्यपदार्थ महाग होणार आहेत. यामध्ये पीठ, पनीर आणि दही यांसारख्या पॅकेजिंग केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. या वस्तूंवर आता पाच टक्के जीएसटी लागू होईल. तर ५,००० रुपयांपेक्षा जास्त भाड्याने घेतलेल्या हॉस्पिटलच्या खोल्यांवरही जीएसटी भरावा लागेल. याशिवाय दररोज १,००० रुपयांपेक्षा कमी भाड्याने मिळणाऱ्या हॉटेलच्या खोल्यांवर १२ टक्के दराने कर आकारण्यात येणार आहे. त्यावर सध्या कोणताही कर नाही.

GST कौन्सिलने गेल्या आठवड्यात आपल्या बैठकीत पॅकिंग केलेले आणि लेबल केलेले दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखना, सुका सोयाबीन, मटार, यांसारख्या उत्पादनांवर कर वाढीला मान्यता दिली आहे. तसेच गहू आणि इतर अन्नधान्य आणि तांदूळ यावर ५% जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. कर दरातील बदल १८  जुलै म्हणजेच आजपासून लागू होतील. त्याचप्रमाणे बँकेद्वारे जारी केलेल्या चेकवर १८ टक्के जीएसटी आणि अॅटलससह नकाशे आणि चार्टवर १२ टक्के जीएसटी आकारला जाईल.

उघड्यावर विकल्या जाणार्‍या ब्रँड नसलेल्या उत्पादनांवर जीएसटी सूट कायम राहील. प्रिंटिंग/ड्रॉइंग इंक, धारदार चाकू, पेपर कटिंग चाकू आणि पेन्सिल शार्पनर, एलईडी दिवे, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादनांवरील कराचे दर १८ टक्के करण्यात आले आहेत. सोलर वॉटर हीटर्सवर आता १२ टक्के जीएसटी लागणार आहे, जो पूर्वी पाच टक्के होता. जीएसटीच्या नियमांनुसार, हॉस्पिटलमध्ये दररोज ५,००० रुपयांपेक्षा जास्त भाड्याने घेतलेल्या खोलीवर ५ टक्के दराने जीएसटी लागू होईल. त्यामुळे पाच हजार रुपयांना भाड्याने घेतलेल्या रुग्णालयाच्या खोलीवर थेट २५० रुपये कर भरावा लागणार आहे. रुग्णाला एकूण ५२५० रुपये द्यावे लागतील. जीएसटी लागू केल्यानंतर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णावर अतिरिक्त बोजा पडेल, ज्यामुळे वैद्यकीय खर्चात वाढ होईल.

आता तुम्हाला १००० रुपयांच्या हॉटेल रूमवरही GST भरावा लागेल, आतापर्यंत १००० रुपयांपर्यंतच्या रूमवर GST नव्हता. यावर १२ टक्के जीएसटी आकारण्यात यावा, असा प्रस्ताव जीएसटी कौन्सिलने दिला आहे. त्यामुळे आजपासून ७५०० रुपयांपर्यंतच्या हॉटेलच्या खोल्यांवर १२ टक्के जीएसटी आकारला जाईल, तर त्यापेक्षा जास्त खोल्यांवर १८ टक्के जीएसटी लागू होईल. मात्र आयसीयू बेड किंवा आयसीयू रूम जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवल्या आहेत.

रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि स्मशानभूमीच्या कामाच्या कंत्राटांवर आता १८ टक्के जीएसटी लागू होईल, जो आत्तापर्यंत १२ टक्के होता. मात्र, रोपवे आणि काही सर्जिकल उपकरणांद्वारे माल आणि प्रवाशांच्या वाहतुकीवरील कराचा दर पाच टक्क्यांवर आणण्यात आला आहे. पूर्वी तो १२ टक्के होता.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.