पुणे, दि.१५ जुलै २०२२
(चेकमेट टाईम्स): उद्योगनगरी
पिंपरी चिंचवडमधील एका कपंनीत काही अज्ञात पुष्पाने शेकडो झाडांची कत्तल केल्याची
धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेने सगळीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पिंपरीतील मे.फॉरमायका
याकंपनीत हा प्रकार घडला, धक्कादायक बाब
म्हणजे तोडलेल्या वृक्षाचे पुरावे नष्ट करण्यासाठी या जागेचं JCB द्वारे सपाटीककरणं करण्यात आले आहे. मात्र आत सॅटॅलाइट इमेजवरून हे दृष्य
पाहिल्यास मोठ्या प्रमाणात झाडे तोडल्याच समजून येते.
पिंपरीतील "अपना -वतन
" या सामाजिक संघटनेने हे प्रकरण उघडकीस आणले आहे. त्यानंतर महापालिका
प्रशासन खडबडून जागी झाली आहे. यानंतर महापालिकेचे प्रशासक राजेश पाटील यांनी आता
संबंधित कंपनी प्रशासनाला अवैध वृक्ष तोड केल्याप्रकरणी तब्बल ४५ लाख
रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र महापालिका करत असलेली कारवाई किरकोळ असून
प्रशासक राजेश पाटील हे वृक्ष तोड प्रकरणात सहभागी असलेल्या ठेकदार आणि पालिका
अधिकारी कर्मचाऱ्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप ‘अपना वतन’ संघटनेने
केला. त्यामुळे शेकडो देशी झाडांची कत्तल करणारा पुष्पा कोण हा सवाल उपस्थित केला
जात आहे. दरम्यान या पुष्पाला पाठीशी कोण घालतय याचा लवकर उलगडा करावा असे
नागरिकांमधून मागणी होत आहे.
पिंपरी
-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणावर विनापरवाना
वृक्षतोड केली जात आहे. अनेक ठिकाणी कारवाई केली जात नाही. खूपच पाठपुरावा केला तर
नावापुरती कारवाई केली जाते. राजकीय पुढारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीने अतिशय पद्धतशीरपणे
उद्यान विभागातील अधिकारी सुपारी घेऊन झाडांची कत्तल करीत असल्याचा आरोप संतप्त
नागरिकांनी केला.
मागील आठवड्यात आकुर्डीमधील एका कंपनीमध्ये मोठ्या
प्रमाणावर विनापरवाना अवैध वृक्षतोड करण्यात आली. या वृक्षतोडीसाठी पिंपरी चिचंवड
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनच बेकायदेशीर ग्रीन सिग्नल देण्यात आला होता अशी
दबक्या आवाजात चर्चा आहे. शिवाय याठिकाणहून वृक्षतोड करून झाडे वाहतूक करण्यासाठी १० ते १२ मोठ्या
गाड्या व ट्रेलर वापरण्यात आली असल्याची चर्चा आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर
उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84