पुणे दि. १२ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी
काहीही नाही परंतु तुम्हीची ताकद मला हवी आहे. सध्या तुम्हाला विदाऊट तिकीट प्रवास
करावा लागणार आहे. लढायचे असेल तर सोबत राहा, भाजपाचा
शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे, असा
पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
हिंमत
असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असे
आव्हान ठाकरेंनी यावेळी दिले. सध्याच्या घटनेवरून त्यांनी राज्यात कशापद्धतीने
घटनेची पायमल्ली करून कारभार सुरू आहे, याची
माहिती दिली.
मातोश्री
येथे पुणे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची व सर्व नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली
होती. यावेळी त्यांना मार्गदर्शन करत असताना भाजपासह शिवसेनेतून बंड करून
निघालेल्या आमदारांवर टीका केली.
एकीकडे न्यायालयात बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न प्रलंबित असताना दुसकीकडे बहुमत चाचणी, विश्वासदर्शक ठराव मांडला जातो, यावर त्यांनी बोट ठेवले.शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात आता शिवसेना न्यायालयाचे दरवाजेही ठोठावणात असून अरुणाचल प्रदेश सारखा निकाल लागण्याची शक्यता असल्याचे देखील श्री ठाकरे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बोलताना त्यांचे मन भावुक झाले होते. त्या म्हणाल्या की यापुढे आपण एक जुटीने व ताकतीने काम करायचे आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर
उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84