पुणे, दि.१६ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): मुलीला आत्ताच माझ्यासोबत नांदायला पाठवा, नाहीतर तुम्ही चला,
अशी अर्वाच्य भाषा वापरून सासूचाच हात धरणाऱ्या जावयाला पोलिसांनी
बेड्या ठोकल्या. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास भोर तालुक्यातील एका गावात
घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या दोघांचे काही
वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांना दोन मुलेही आहेत. काही गोष्टींवरून कुरबूर
होत होती. नुकतेच नवरा-बायकोचे भांडण झाल्यानंतर बायको माहेरी निघून गेली होती.
काही दिवसांनी नवरा तिला नेण्यासाठी सासरवाडीत पोचला त्याने वैशालीला परत पाठवा,
असे सासुबाईला सांगितले. मात्र पोरं लहान आहेत व बाहेर पाऊस आहे,
आज राहा व दोघेही उद्या मुलाबाळांसह जा, असे
सांगितले. मात्र त्यावर जावयाने पोरीला पाठवणार नसाल तर तुम्हीच चला, अशा अर्वाच्य भाषेत सासुबाईचाच विनयभंग केला.
त्यावरून सासरे आणि इतरांनी जावयाला समज दिली, त्यातून वाद झाला व
हाणामारी झाली. त्यानंतर सासुबाईंनीच जावयाविरुद्ध तक्रार दिली. याबाबत पोलिसांनी
जावयाला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्याची
रवानगी येरवाडा कारागृहात केली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84