Type Here to Get Search Results !

'मासिक पाळीत झाड लावलं तर ते जळतं', 'त्या' दाव्यावरून रुपाली चाकणकर संतापल्या

 


पुणे,दि.२८ जुलै (चेकमेट टाईम्स) : वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात शाळेतील शिक्षकाने सूचना करून मासिक पाळी असलेल्या विद्यार्थीनींना वृक्षारोपण करू दिले नाही. मासिक पाळीत झाड लावले तर, ते जळून जाईल, असे शिक्षकांनी सांगितले. हि घटना इगतपुरी येथील त्र्यंबक देवागाव आश्रम शाळेतील आहे. याप्रकरणी एका विद्यार्थिनीने थेट तक्रार केली आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त होत असून प्रकरणाची गंभीर दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे.

शाळेत हा घडलेला प्रकार पालकांना समजल्यानंतर आदिवासी विकास विभागाकडे तक्रार करण्यात आली. या प्रकरणी दोषींवर कारवाईचे आदेश अप्पर आयुक्तांनी दिले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल महिला आयोगाने घेतली असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी घटनेची चौकशी करुन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

२१ व्या शतकातही अंधश्रद्धेपोटी महिलांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने रुपाली चाकणकर संतापल्या आहेत. दरम्यान, याबाबत कायदा असूनही शिक्षकच अशाप्रकारचे चुकीचे वर्तन करत असल्याने आश्चर्च व्यक्त होत आहे.काही दिवसांपूर्वीच देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती म्हणून आदिवासी महिला विराजमान झाल्या.असे असताना दुसरीकडे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आदिवासी मुलींना शिक्षकांनीच दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.