Type Here to Get Search Results !

अमेरिकेत ‘‘सेक्स बंद’’ हे महिलांचं आंदलोन पसरतय वणव्यासारख.

 


दि. 04 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): अमेरिका या देशाकडे आपण नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि विचारांचा देश म्हणून बघतो.जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांमध्ये भारता नंतर जगात दुसऱ्या क्रमांकांवर असलेला हा देश व्यक्ती स्वातंत्र्याला विशेष प्राधान्य देतो हे या देशातील नेते, लोक नेहमीच सांगत असतात, पण २४ जून रोजी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने जाहीर केलेल्या गर्भपात बंदीच्या निर्णयाने वरील सर्व विधानांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.

गर्भधारणा किंवा गर्भपात हा एका महिलेचा व्यक्तिगत अधिकार हिरावून घेण्याचा निर्णय नव्याने स्थापन झालेल्या जो बायडनयांच्या सरकारने घेतला आणि अमेरिकेच्या लोकांचा चांगलाच रोष ओढवून घेतला आहे. रो वर्सेस वेड जजमेंटया नावाने हा निर्णय ओळखला जातोय, ज्यामध्ये गर्भपात बंदीया निर्णयाची अंमलबजावणी करण्याची कायदेशीर जबाबदारी ही प्रत्येक स्टेट्सवर सोपवण्यात आली आहे. अमेरिकेतील काही राज्यांमध्ये सध्या गर्भपातावर सरसकट बंदी आणण्यात आली आहे, तर काही राज्यांमध्ये येत्या काही काळात ही बंदी येणं अपेक्षित आहे, काही राज्यांनी गर्भपात बंदी मान्य केलेली नाही तर काही राज्यांनी गर्भपात करण्यासाठी अटी अधिक जाचक केल्या आहेत. गर्भपात बंदीहा निर्णय अमेरिकेच्या सरकारला का योग्य वाटतोय? जाणून घेऊयात.

युनायटेड नेशन्सच्या प्रतिनिधी मिशेल बॅचलेट यांनी २४ जून २०२२ रोजी अशी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. १९७३ मध्ये अमेरिकेत रो (Roe)’ या गर्भपात बंदी संबंधित घेण्यात आलेल्या निर्णयाची ही पार्श्वभूमी होती, की त्या वर्षी हजारो नवतरुण मुली गर्भवती झाल्या होत्या. या मुलींना त्यांच्या शारीरिक प्रकृतीमुळे आई होणं आणि कमी वयामुळे लग्न करणं हे दोन्ही शक्य नव्हतं. गर्भपात होण्याचं प्रमाण थांबवण्यासाठी हा निर्णय १९७३ मध्ये घेण्यात आला होता. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने गर्भपात संबंधित निर्णय हे ज्या राज्यातून ही विनंती येत आहे त्यांनी घ्यावा असं सांगितलं आणि गर्भपात बंदी सरसकटपणे हटवण्याची घोषणा केली नाही याचा तिथल्या लोकांना राग आहे. अमेरिकेने हे देखील ठरवलं आहे, की गर्भपात करू इच्छिणाऱ्या व्यक्तीचं वय जर २५ वर्षांपेक्षा अधिक असेल तर त्यांना कोणतंही विमा कवच दिलं जाणार नाही याचा अमेरिकेतील सजग नागरिक हे रस्त्यावर उतरून विरोध करत आहेत.

गर्भपात हा प्रत्येक वेळी गुन्हा नसतो, काही वेळेस ती अपरिपक्व शरीराची किंवा गर्भाची गरज असते जे की आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि जागतिक आरोग्य संघटनेने देखील मान्य केलं आहे. गर्भपात बंदीचा सर्वात मोठा फटका समाजातील दारिद्र्य रेषेच्या खाली असणाऱ्या लोकांना बसेल अशी भीती सध्या विविध माध्यमातून व्यक्त केली जात आहे. जगातील एकूण ५० देशांमध्ये एकेकाळी गर्भपात बंदी ही महिलांवर लादण्यात आली होती, पण त्यापैकी २५ देशांनी ही बंदी केव्हाच उठवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, जगात एका वर्षात साधारणपणे २.५ कोटी महिला असुरक्षितपणे गर्भपात करत असतात. त्यापैकी ३७,००० महिलांना त्यामुळे आपला जीव गमवावा लागत असतो. सुरक्षित गर्भपात हा महिलांची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असतो याकडे अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने दुर्लक्ष केलं हे अमेरिकेच्या लोकांसाठी आश्चर्याचा मोठा धक्का आहे.

२०२२ मध्ये द युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडने आपल्या स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्टच्या अहवालात जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जगातील केवळ ५०% गर्भधारणा या कोणत्यातरी चुकीने घडून आलेल्या असतात आणि यापैकी ६०% महिला या गर्भपात करण्याचा निर्णय घेत असतात. ज्यापैकी ४५% गर्भपात हे असुरक्षिपणे होत असतात, ज्यामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू होत असतो. २०१२ मध्ये आयर्लंडमध्ये राहणाऱ्या सविता हलप्पनवारया भारतीय दंतशास्त्र तज्ञ महिलेचा गर्भपात बंदीकायद्यामुळे मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आयर्लंडच्या लोकांनी त्यांच्या देशातील सरकार विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला होता आणि २०१८ मध्ये आयर्लंडला रेग्युलेशन ऑफ टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीहा कायदा आमलात आणण्यासाठी भाग पाडलं होतं.

अमेरिकेत राहणारे लोक असा कोणता पवित्रा घेतील का ? याकडे सध्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. महिलांच्या प्रकृती सुरक्षेसाठी घातक असलेला गर्भपात बंदीचा निर्णय अमेरिका येत्या काळात मागे घेईल अशी आशा व्यक्त करूयात.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.