दि. 01 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा
व्यवस्थापन विभागामार्फत ओल्या कचऱ्यापासून Compressed
Biogas (CBG) इंधन
निर्मितिचा प्रकल्प सुस रोड, बाणेर येथे उभारण्यात आलेला आहे.
या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या CBG इंधनापासून पुणे शहरातील बसेस
चालविण्याचे अभिनव उपक्रमाचा उद्घाटन समारंभ आज दि. १/७/२०२२ रोजी पुणे
महानगरपालिका मुख्य इमारती समोरील बस स्थानक येथे मा. महापालिका आयुक्त विक्रम
कुमार यांच्या हस्ते पार पडला. पुणे शहरातील बसेस चालविण्याचे अभिनव उपक्रम “सिटी वेस्ट टू सिटी बस” पुणे महानगरपालिका, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि., इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, मे. नोबेल एक्स्चेंज यांच्या संयुक्त संकल्पनेने राबविण्यात येत आहे.
सीएनजी ऐवजी पुणे शहरातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून निर्माण
झालेल्या सिबिजीचा (CBG) हा एक पर्यावरणपूरक दीर्घकालीन
शाश्वत उपाय आणि इतर शहरांसाठी अनुकरण करण्यासाठी एक आदर्श ठरेल. तळेगावजवळील
सोमाटणे येथे असलेल्या इंडियन ऑईल रिटेल आउटलेटमध्ये पीएमपीएमएलच्या बसेसला इंधन
दिले जाईल. आजपासून दैनंदिन सुमारे १०-१५ बसेसमध्ये कचऱ्यापासून निर्माण होणारे CBG इंधन भरण्यासाठी व्यावसायिक ऑपरेशन्स सुरु झाले आहे आणि टप्प्याटप्प्याने
दैनंदिन सुमारे १०० सिटी बसेसपर्यंत सदरचे उपक्रम राबविण्यात येणार आहे. याकरिता
सध्यस्थितीत पुणे शहरामध्ये निर्माण होणारे सुमारे १२५ मे. टन ओला कचरा सदर
प्रकल्पामध्ये प्रक्रिया करण्यात येत असून सदर प्रकल्पाची २०० मे. टन प्रती दिन
क्षमता वाढ करण्याचे नियोजन आहे.
सदर कार्यक्रम मा. अतिरिक्त महापालिका (ज) रवींद्र बिनवडे, मा. अतिरिक्त महापालिका (ई) डॉ. कुणाल खेमनार, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. चे मा. व्यवस्थापकीय संचालक ललित
कुमार मिश्रा, मा. उप आयुक्त आशा राऊत (घनकचरा
व्यवस्थापन विभाग) आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडचे जनरल म̆नेजर श्री. रवींद्र के आर व मे. नोबल एक्स्चेंज कडील अधिकारी श्री नुरीअल पेझरकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर
फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84