Type Here to Get Search Results !

तुमचंही Gmail स्टोरेज फुल झालंय ? मग असं रिकामं करा स्टोरेज

 


पुणेदि.२५ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): आजच्या डिजीटलायझेनच्या जगात जीमेल हे अत्यंत महत्वाचं टूल आहे. सरकारी असो वा खाजगी जवळपास सर्वच कार्यालयात वापरात येणारं जीमेल हे सर्वात महत्वाचं टूल आहे. विद्यार्थ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाचं या काळाच जीमेल अकाऊंट असतंच. आणि अनेक अॅप्लिकेशन्स आपल्या जीमेल अकाऊंटशी यावेळी लिंक्ड असतात. त्यामुळे दिवसभऱ्यात किती तरी मेल आपल्याला येत असतात. आणि दररोजचा विचार केला तर असे शेकडो मेल जमा होतात. आपल्या मोबाईलमध्ये जीमेलसाठी मोजकाच स्टोरेज असल्याने अनेकांना त्यामुळे अडचणी येतात.या सोप्या टीप्सने तुम्ही स्टोरेज रिकामा करू शकता. (Free up Gmail storage space with easy tips)

जेव्हा तुमचा स्टोरेज १५ जीबीला (GB) पोहोचतो तेव्हा तुम्हाला फुल स्टोरेज अशी नोटीफिकेशन येते. तेव्हा तुम्हाला स्टोरेज रिकामं करायचं असतं. मात्र माहितीच्या अभावी अनेकांना स्टोरेज  (storage) रिकामं करण्यात अडचणी येतात. चला तर जाणून घेऊया जीमेलचं स्टोरेज रिकामं करण्याच्या काही टीप्स.

याच्या दोन पद्धती आहेत

१. पहिली पद्धत म्हणजे तुम्ही मोठे म्हणजेच लार्ज मेल (large mail) डिलीट करून टाका.

२. दुसरी पद्धत म्हणजे निरर्थक मेल अनसर्बस्क्राईब (Unsubscribe) करा.

 जीमेल स्टोरेज स्पेस फ्री करण्यासाठी तुम्हाला ही ट्रीक कामी येईल.

१. तुम्ही जीमेलला जाऊन 'has:attachment large:10M' सर्च करा.

२.हे सर्च केल्यानंतर १० जीबी (10 Gb) किंवा त्यापेक्षा मोठे असणारे सगळे मेल तुम्हाला दिसतील.

३. यातील तुम्हाच्या कामाचे नसलेले मेल सिलेक्ट करून तुम्ही डिलीटवर क्लिक करा.

४. त्यानंतर ट्रॅश फोल्डरवर जा आणि एम्टी ट्रॅश बटनवर क्लिक करा.

तसेच दररोज येणारे अनुपयोगी मेल तुम्ही त्या मेल मध्ये जाऊन अनसबस्क्राईब करा. त्यानंत पॉपअप स्क्रिनवर दिसणाऱ्या अनसबस्क्राईब परत क्लिक करा. यामुळे तुमचं स्टोरेज फुल होणार नाही.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.