पुणे, दि.२५ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): पिंपरी चिंचवडमध्ये गुप्त धनाच्या हव्यासापोटी नरबळी
देण्याच्या उद्देशाने एका तीन वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. संबंधित
प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आलं आहे.
आरोपी चिमुकलीला अपहरण करुन जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्या
आधारावर पोलिसांनी आरोपींचा छडा लावला.
विशेष म्हणजे मुलगी हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पिंपरी
चिंचवडमधील जवळपास २०० पोलीस कार्यरत झाले होते. या सर्व पोलिसांनी शहरात मुलीचा
शोध घेतला. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी जीव ओतून तपास केला. त्यांच्या या
प्रयत्नांना अखेर यश आलं आणि अवघ्या २४ तासांच्या आत आरोपींच्या तावडीतून
पोलिसांनी मुलीची सुटका केली.
या प्रकरणी विमल संतोष चौगुले, संतोष
मनोहर चौगुले, सुनीता अशोक नलावडे, निकिता
अशोक नलावडे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात
घेण्यात आलं आहे. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर सर्वांना २७ जुलैपर्यंत
पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तर ज्या भोंदू बाबाच्या सांगण्यावरून मुलीचं अपहरण
केलं गेलं त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपींनी मुलीचं नरबळीसाठी अपहरण केलं की विकण्यासाठी किंवा अन्य
कारणासाठी अपहरण केलं होतं याचा तपास घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मुलीचं
अपहरण नरबळीसाठी करण्यात आल्याची शंका पीडित मुलीच्या कुटुंबंयांनी व्यक्त केली
होती. पण पोलिसांनी आपल्याला त्याबाबत अजून ठोस माहिती उपलब्ध झालेली नाहीय, अशी
प्रतिक्रिया दिली आहे.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84