पुणे,दि.२८ जुलै (चेकमेट टाईम्स)
: पुण्यात महिला वकिलाकडे पाहून गाणं म्हणणं एका
वकिलाला चांगलंच महागात पडले आहे. आपल्या जुनिअर वकिलाच्या विनयभंगाप्रकारणी अॅड.
धर्मराज विनायक जाधव (वय. ४०) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीने
केलेल्या आरोपानुसार, जाधव हे
फिर्यादीकडे पाहून मौसम मस्ताना है गाणे म्हणत किस मागितली. तसेच आरोपीने
फिर्यादीच्या छातीला हात लाऊन मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीकडे पाहून गाणे म्हटले. तसेच तिला स्पर्श करून तिचा विनयभंग केला. आरोपी विनायक जाधवने फिर्यादीकडे किस मागितले त्यास विरोध केला असता फिर्यादीवर जबरदस्ती करत तिच्या अंगाला जाणीवपूर्वक हात लावला. त्याचबरोबर फिर्यादीला आणि तिच्या पतीला आरोपीने मारहाणही केली आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी
न्यायालायात बाजू मांडणाऱ्या रक्षकांकडूनच झालेल्या अशा अत्याचाराच्या घटना
धक्कादायक आहेत. सोबत काम करणाऱ्या सहकारी महिला वकिलासोबत अश्लिल चाळे केल्याने
आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप अटक
करण्यात आली नाही.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84