दि. 02 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात विविध घडामोडी घडताना दिसत आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय सत्तानाट्यावर पडदा पडला असला तरी राजकारण काही संपलेले दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनपेक्षित उलथापालथ पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आधारित एक नवी कोरी वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिजित पानसे दिग्दर्शित ‘राजी-नामा’ असे या वेबसीरिजचे नाव आहे. ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर ही वेबसीरिज झळकणार आहे. अभिजित पानसे यांच्या ‘रानबाजार’ या वेबसीरिजला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या वेबसीरिजनंतर आता अभिजित पानसे आणि चिन्मय मांडलेकर ही जोडी ‘राजी-नामा’ ही वेबसीरिज प्रदर्शित करणार आहे. या वेबसीरिजची कथा प्रियम गांधी मोदी यांच्या ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकावर आधारित आहे. ‘राजी-नामा’ वेबसिरीजची संकल्पना आणि लेखन चिन्मय मांडलेकर यांनी केलं आहे. या वेबसिरीजच्या निमित्ताने प्रेक्षकांना लवकरच एक राजकीय सनसनाटी विषय पाहायला मिळणार आहे.
अभिजित पानसे यांनी स्वत: इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या आगामी वेबसीरिजबद्दल आहे. महाराष्ट्रात ‘रानबाजार’ सुरूच आहे…आता “राजी-नामा” देतोय! प्रियम गांधी मोदी यांच्या ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकावर आधारित, लवकरच फक्त ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर – “राजी-नामा” असे कॅप्शन अभिजित पानसे यांनी दिले आहे. प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी प्रस्तुत ‘राजी-नामा’चे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केले आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षक या वेबसीरिजची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. दरम्यान अभिजित पानसे आणि राजकारणातील ज्वलंत विषय हे एक समीकरणच आहे. त्यामुळे त्यांच्या चित्रपटाचे विषय हे नेहमीच हटके असतात.आंतरराष्ट्रीय दर्जाचा आशय असलेल्या ‘रानबाजार’ला जगभरातील प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. यशोशिखरावर पोहोचलेल्या ‘रानबाजार’मधील सत्तानाट्यानंतर आता ‘राजी-नामा’मध्येही ‘खुर्ची’साठी चाललेले राजकीय युद्ध पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता हा ‘राजी-नामा’मंजूर झाल्यावर सत्ताचक्रं कशी फिरणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84