पुणे, दि.२१ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): राज्यात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च
न्यायालयाने बुधवारी (दि.२०) झालेल्या सुनावणीत बांठिया आयोगाच्या शिफारसींना
मान्यता दिली. तसेच पुढील दोन आठवड्यांत बांठिया अहवालानुसार निवडणुका घोषित
करण्याचे आदेश दिले. दरम्यान बांठिया आयोगाने दिलेल्या अहवालात ओबीसींची संख्या ३७
टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, लोकसंख्येच्या तुलनेत ५० टक्के
आरक्षणाची तरतूद असल्याने ओबीसींचं आरक्षण कमी करुन १७ टक्के करण्याची मागणी मराठा क्रांती
मोर्चाने केली आहे. तसेच हे उरणारे १० टक्के आरक्षण मराठा समजाला द्या असे मराठा
क्रांती मोर्चाच्या वकिलांनी म्हटले आहे.
यासंदर्भात
सविस्तर माहिती देताना मराठा क्रांती मोर्चाचे वकील अभिजित पाटील म्हणाले, ओबीसी
आरक्षणासंदर्भात बांठिया आयोगाचा अहवाल आहे आहे. त्यात ओबीसींची लोकसंख्या ३७
टक्के निश्चित करण्यात आली आहे. हा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला
आहे. या अहवालाच्या वैधतेबाबत न्यायालयाने कोणताही निर्णय दिलेला नाही. या
अहवालाच्या वैधतलेला आव्हान देण्याचा पर्याय न्यायालयाने मोकळा ठेवला आहे.
आरक्षण
देण्याच्या पद्धती नुसार लोकसंख्येच्या तुलनेत ५० टक्के आरक्षण दिले जाते.
त्यामुळे आता ओबीसींना महाराष्ट्रात लोकसंख्येच्या प्रकरणात आरक्षण देण्यात यावे, अशी
मराठा समाजाची मागणी आहे. त्यानुसार ओबीसींना १७ टक्क्यांच्या आसपास आरक्षण मिळेल,
त्यानंतर उरलेले १०-११ टक्के आरक्षण हे मराठा समाजाला द्यावी अशी
मागणी आमची आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे वकील अभिजित
पाटील यांनी म्हटले आहे.
मराठा क्रांती
मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले की, सध्या
मराठा समाजासाठी परिस्थिती चांगली आहे. आधीच्या सरकारमध्ये मराठा समाजाचं ऐकलंच
जात नव्हतं, जे मंत्री होते ते मराठा समाजाला मदत करण्याच्या
भूमिकेमध्ये नव्हतेच, उलट मराठा समाजाचं आरक्षण गेलं तेव्हा पेढे वाटणारे
मंत्री तिथे होते. त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला काय मिळेल ही अपेक्षाच मराठा समाजानं सोडून
दिली होती. ज्या प्रकारे
ओबीसींचा निकाल लागला त्याप्रमाणे मराठा समाजाची प्रलंबित असलेली पुनर्विचार
याचिका मार्गी लावून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग सुकर करावा, अशी मागणी असल्याचे वीरेंद्र पवार यांनी
सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84