दि. 04 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): कोंढव्यात
बेकायदेशिररित्या मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या
अंमली पदार्थ विरोधी पथक 2 ने कारवाई केली. यावेळी एका अटक करत
त्याच्याकडून 20 लाख 52 हजारांचे 171 ग्रॅम
मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे अशी महिती पोलिसांनी रविवारी दिली आहे. राहुल
हितेश्वर नाथ (24, रा. शिवानेरी
नगर, मुळरा. गुवाहटी, आसाम) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 2) रोजी
पथकातील अमंलदार कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी
सात वाजण्याच्या सुमारास पथकातील अमंलदार आझीम शेख यांना शिवनेरीनगर येथे बंदी
असलेल्या मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश खांडेकर, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, नितीन
जगदाळे, युवराज कांबळे, दिशा
खेवलकर यांच्या पथकाने छापा टाकून राहुल नाथ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील
झडतीत एम महागडा मोबाईल, 31 हजार 500 रूपयांची
रोकड, वेस्पा दुचाकी आणि 20 लाख 52 हजारांचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. त्याच्याकडून यावेळी 21 लाख 58 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अपर पोलिस
आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली
अंमली पदार्थ विरोधी पथक 2 ने केली.
आमच्या पथकाने एकाला कोंढव्या परिसरातून अटक केली असून तो
गेल्या सात ते आठ वर्षापासून कोंढवा परिसरात राहण्यास आहे. त्याच्याकडून 20 लाख 25 हजारांचे
मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. त्याने हा अंमली पदार्थ बाहेरच्या शहरातून
आणल्याचे सांगत आहे. त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे. त्यांचे नेमके कोण ग्राहक
होते याचीही माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे.- प्रकाश
खांडेकर, वरिष्ठ निरीक्षक, अंमली
पदार्थ विरोधी पथक 2, गुन्हे शाखा.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया
असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती
आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात
आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84