पुणे, दि.२२ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील तळजाई परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत टोळीविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेही ही ८८ वी कारवाई आहे. मोक्का कारवाईमुळे सराईत टोळ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
टोळीप्रमुख सोनू उर्फ आनंद सिद्धेश्वर धडे (वय – २२), प्रेम गणेश
चांदणे (वय – २३), नागेश सतीश शिंदे
(वय – १८), मंगल्या उर्फ मंगल
बाबासाहेब भिसे (वय २३, सर्व रा. तळजाई वसाहत, पद्मावती) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
संबंधित टोळीमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांच्या विरोधात
गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. टोळीविरूद्ध खुनाचा प्रयत्न, लूट, मारहाण,
खुनाचा कट असे गंभीर स्वरुपाचे १२ गुन्हे सहकारनगर पोलीस ठाण्यात
दाखल झाले आहेत. त्याशिवाय त्यांनी स्वारगेट, कोंढवा,
सहकारनगर भागात गुन्हे केले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात
मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळराम साळगावकर यांनी
पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्यावतीने अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे
यांच्याकडे सादर केला. प्रस्तावाला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंजूरी दिली.
नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत गुन्हेगारी करणाऱ्या सराईत
टोळ्याविरूद्ध मोक्का कारवाईचा बडगा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी उगारला आहे.
त्यानुसार मागील सहा महिन्यांत तब्बल २५ सराईत टोळ्यांविरूद्ध मोक्का कारवाई करून
त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याशिवाय आतापर्यंत ८८ टोळ्यांविरूद्ध
कारवाई करून मोक्कास्त्र फायदेशीर ठरले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84