पुणे
दि. १४ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) :
क्राईम सिटी नागपूरमध्ये
सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. मागील २४ तासांत
दोन घरफोडीच्या घटना ताजी असतानाच आता लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे. अंगणवाडी
सेविकांशी संबंधित हे प्रकरण आहे. अडीच हजारांची लाच घेताना तीन अंगणवाडी
सेविकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बचत गटाच्या अध्यक्षांकडून पोषण आहाराच्या बदल्यात
लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन अंगणवाडी सेविकांना
रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. सीमा
राजेश राऊत (४७), मंगला प्रकाश प्रधान (४६) आणि उज्ज्वला भालचंद्र वासनिक (५१), अशी तीन लाच
मागणाऱ्या आरोपी महिलांची नावे आहेत.
याप्रकरणी एका ६० वर्षीय महिला बचत गटाच्या अध्यक्षांनी तक्रार केली
होती. चार अंगणवाड्यांमध्ये ताज्या पोषण आहाराचा पुरवठा करण्याचे कंत्राट बालविकास
प्रकल्प अधिकाऱ्यांकडून त्यांना मिळाले आहे. त्या अंगणवाड्यांमध्ये आरोपी अंगणवाडी
सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविका दर महिन्याला पोषण आहार पुरवठ्याची माहिती
पुस्तकात नोंदवतात. त्याआधारे पैसे बचत गटाला दिले जातात. पुस्तकात माहिती
टाकण्याच्या बदल्यात आरोपी महिला तक्रारदाराकडे पैशांची मागणी करत होत्या. यानंतर
तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
दर
महिन्याला पोषण आहार वाटपासाठी ५०० रुपये आणि साप्ताहिक सुट्टीसाठी १०० रुपये आणि
चार अंगणवाड्यांसाठी २४०० मागण्यात आले. तक्रारदार महिलेला लाच देण्याची इच्छा
नव्हती. त्यामुळे या महिला बचत गटाच्या अध्यक्षांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार
केली. तक्रारीची खातरजमा करण्यात आली. यानंतर सापळा रचण्यात आला आणि अंगणवाडी
सेविकांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर
उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84