पुणे, दि.२३ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): स्थानिक स्वराज्य
संस्थामध्ये ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर
आता राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षण काढण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला
आहे. पुणे महापालिकेसह राज्यातील १३ महापालिकांचा सोडत २९ जुलै रोजी काढली जाणार
आहे. तर अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण कायम ठेवत, सर्वसाधारण
महिलांसाठी आरक्षीत झालेल्या जागेवरील आरक्षण रद्द केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने व
सर्वोच्च न्यायालयात त्याबाबतचा निर्णय लवकर येत नसल्याने राज्य निवडणूक आयोगाने
राज्यातील सर्व महापालिकांना ओबीसी आरक्षणाचा विचार न करता एसटी, एससी व सर्वसाधारण गटातील महिलांचे आरक्षण
काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ३१ मे रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
पुणे शहरात २३ अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमातीचे आरक्षण
निश्चीत करण्यात आले. तर ८७ ठिकाणी महिलांचे आरक्षणाची सोडत काढली होती. या
निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार हे स्पष्ट झाल्याने इच्छुक उमेदवार कामाला
लागले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण कायम असल्याचा निर्णय दोन
दिवसांपूर्वी दिल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यानुसार ओबीसी आरक्षणाच्या
सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
पुणे महापालिकेत एकूण १७३ नगरसेवक असणार आहेत. त्यापैकी ४७
जागा या ओबीसीसाठी आरक्षीत असणार आहेत. त्यापैकी २४ जागांवर ओबीसी महिलांचे आरक्षण
असणार आहे. मात्र, या ओबीसी
आरक्षणामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचेही आरक्षणही रद्द करण्याची वेळ आली
आहे. आता नव्याने कोणत्या ५० जागांवर सर्वसाधारण महिलांचे आरक्षण पडणार याची
उत्सुकता लागली आहे.
पुणे महापालिकेसाठी तीनचा प्रभाग असून, प्रत्येक प्रभागात अ, ब, क अशा जागा आहेत. ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित
जाती व जमातीचे आरक्षण पडलेले नाही त्या प्रभागात अ जागा ही ओसीबी आरक्षणासाठी
असणार आहे. जेथे एसटी, एससीचे आरक्षण आहे अशा काही प्रभागात
ब जागा ही ओबीसी आरक्षणासाठी राखीव असणार आहे.
असा आहे सोडतीचा कार्यक्रम
- आरक्षणाची जाहिरात देणे-२६ जुलै
- आरक्षणाची सोडत काढणे - २९जुलै
- आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे-३० जुलै
- आरक्षणावर प्रभागनिहाय हरकती मागविणे- ३० जुलै ते २ ऑगस्ट
- हरकती सूचनांचा विचार करून अंतिम आरक्षण जाहीर करणे- ५ ऑगस्ट
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84