पुणे, दि.२० जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): महापालिका भवनाजवळ
लॉटरीच्या नावाखाली खुलेआम सुरु असलेल्या ऑनलाइन जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या
सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईमध्ये 55 जणांविरुद्ध
गुन्हा दाखल करुन साडे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ऑनलाईन जुगार
चालवून शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिका भवनाजवळ अनेक वर्षांपासून लॉटरीच्या नावाखाली ऑनलाइन
जुगार खेळला जात होता. ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली स्वास्तिक लॉटरी सेंटर, स्टार
लॉटरी सेंटर, सवेरा लॉटरी सेंटर, साई
प्रतिक लॉटरी सेंटर, शहा लॉटरी सेंटर, जीपीएस
लॉटरी सेंटर अशा वेगवेगळ्या नावाने ऑनलाईन जुगार सुरु होता. जुगार अड्ड्यांच्या
प्रवेशद्वारांवर जाड कापडी पडदे लावून आतमध्ये जुगार खेळला जात होता. दरम्यान,
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकास याबाबत मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने खातरजमा करुन संबंधित ठिकाणांवर
छापे टाकले. तेथून जुगाराच्या साहित्यासह चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला. ऑनलाईन जुगार प्रकारात जुगार अड्डा मालक, चालकांनी
गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून, संगणकावर ऑनलाईन व्यवहार करुन
शासन महसूल बुडवून राज्य सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
या प्रकरणी अब्दुल मेमन, विजय बनकर, राजेंद्र
माने, सतीश बोगार, किशोर देवकुळे,
बच्चेलाल गौड, श्रावणसिंग नाथावत,संदीप राजपूत, शेळके, रियाज
हणुरे, रफिक शेख, बाळासाहेब जेधे,
मंगेश शितोळे, किसन तेलोरे, अजय शिवमोरे, राजेश यादव, दिपक
ओझा, किशोर नगराळे, विजय भिल्लोड,
सुरेश गारडे, राहुल जगधने, बापू भोसले, सुभाष देवरे, गणेश
परदेशी, गोपाळ पारेकर, नितीन डोंगरे,
महेंद्र बेरी, रामदास खैरे, सलीम शेख, दर्शन साहू, सुशिल
पवार, धनंजय कानगुडे, राजकुमार सरोज,
प्रकाश कंकाळ, राजेंद्र बेल्हेकर, विलास सरजे, प्रवीण नगराळे, सिद्धू
गायकवाड, ज्ञानेश्वर भगत, मनोज शहा
यांच्यासह एकूण 55 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84