Type Here to Get Search Results !

पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना खासगी बसने उडविले

 


पुणे दि. १२ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ येथील पुणा थांब्यावर वाहनांची प्रतीक्षा करीत असलेल्या प्रवाशांना भरधाव आलेल्या खासगी प्रवासी वाहनाने उडविले. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी झाला. जखमींवर शिरवळ तसेच पुणे येथे उपचार सुरू आहेत. अपघातामध्ये खासगी बसचालकाला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

घटनास्थळ व शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील कवठे येथील एका खासगी कंपनीमध्ये मुलाखतीसाठी आलेल्या मयूर रवींद्र रावे (वय २३, सध्या हिंजवडी, पुणे. मूळ रा. चिखली, जि. बुलडाणा) हा तरुण कंपनीमधील मुलाखत संपवून पुणे येथे जाण्याकरिता खासगी कंपनीमधील अधिकारी रणजित राजाराम कुंभार (३२, रा.सातारा) ) यांच्यासमवेत शिरवळ हद्दीमधील महामार्गावर पुणा थांब्यावर वाहनांची प्रतीक्षा करीत होता. दरम्यान, कर्नाटकहून पुणे बाजूकडे निघालेल्या भरधाव खासगी प्रवासी वाहन (एआर ०२ ए ९६९१) चा चालक गुरुराज तमन्ना कुलकर्णी (२६, रा. फत्तेपूर, तालीकोट, जि. विजयपूर, कर्नाटक) याने अचानकपणे महामार्गावर रस्त्यावर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांना गतिरोधक समजून अचानक ब्रेक मारले. त्यानंतर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गावर फिरत वाहनांची प्रतीक्षा करीत असलेल्यांवर गेले.

यामध्ये मयूर रावे, रणजित कुंभार (रा. पुणे), निकिता दत्तात्रय जाधव (२३, रा. अतिट, ता. खंडाळा) व दुकानाचे साहित्य खरेदी करण्याकरिता पुणे याठिकाणी निघालेल्या सुंदर सुरेश मोदी (२८, रा. शिरवळ, ता. खंडाळा) यांना जोरदार धडक दिली. या धडकेत चारही प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच शिरवळचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमींना शिरवळ येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. यावेळी गंभीर जखमी मयूर रावे व निकिता जाधव यांना पुणे येथे अधिक उपचाराकरिता पाठविले. बसचालक गुरुराज कुलकर्णी याला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयूर रावे याने शिरवळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून लक्झरी बसचालक गुरुराज कुलकर्णी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार अरुण भिसे-पाटणकर तपास करीत आहे.

शिरवळ येथील पुणा थांबा अपघाताचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. वारकऱ्यांच्या वाहनांना अपघात होऊन वारकरी जखमी झाले होते. एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शिरवळचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी याबाबत तत्काळ भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्रव्यवहार करीत सदरील पुणा थांबा लोखंडी दुभाजकाने बंद करीत पुणा थांबा महामार्गाच्या पुढे हलविण्याबाबत सूचना करीत पत्रव्यवहार केला आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.