पुणे, दि.१६ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): आपल्याला कुत्र्यांची दहशत ठावूक
आहे. पण, मोकाट कुत्र्यानं माणसांवर
हल्ला केल्याच्या तुम्ही अनेक बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील. मात्र, पाळीव कुत्र्यानंच आपल्या मालकीणीवर हल्ला केल्याची घटना दुर्मिळ म्हणावी
लागेल. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पिटबुलच्या हल्ल्याची ही बातमी
कोणाच्याही मनात भीती निर्माण करणारी आहे. असंच काहीसं प्रकरण युपीत घडलंय.
पिटबुलनं ८० वर्षीय सुशीला त्रिपाठी यांच्यावर भयानक हल्ला केला. पिटबुलनं सुशीला
यांच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले, जे पिटबुलनंही
खाल्ले आहे, असा शेजाऱ्यांचा दावा आहे. या पिटबुलमुळं
संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण आहे. उत्तर प्रदेशातील लखनौच्या कैसरबाग पोलीस
ठाण्याच्या हद्दीत ही घडना उघडकीस आलीय. पाळवी पिटबुल जातीच्या कुत्र्यानं घरातील ८०
वर्षांच्या वृद्धेवर हल्ला केला. गच्चीत या कुत्र्याला फिरवण्याच्या उद्देशानं ही
महिला कुत्र्याला घेऊन आली होती. त्यावेळी थरारक घटनेत या कुत्र्यानं वृद्धेवर
हल्ला चढवला.
दरम्यान, आपल्या धारदार दातांनी या महिलेच्या शरीराचा चावा कुत्र्यानं घेतला.
त्यात गंभीर जखम झालेल्या महिलेचा जीव गेलाय. कैसरबाग ठाणा अध्यक्षांनी याबाबत
अधिक माहिती दिलीय. या घटनेत मृत्यू झालेली महिला ही एक निवृत्त शिक्षिका होती. ८० वर्षांच्या निवृत्त शिक्षिकेवर
घरातील पिटबुल जातीच्या कुत्र्यानं हल्ला चढवला. हा हल्ला अंगावर काटा आणणारा असा
होता. या हल्लात कुत्र्यानं महिलेचं मांसही शरीरावेगळं केलं होतं.
या हल्लावेळी
महिला घरात एकटीच होती. तर तिचा मुलगा ही व्यायामशाळेत गेला होता. जीम ट्रेनर
असलेला या महिलेचा मुलगा जेव्हा घरी आला, तेव्हा त्याला
हा सगळा प्रकार पाहून मोठा धक्काच बसला. दरम्यान, या
महिलेच्या पतीचा आधीच मृत्यू झाला होता. शेजारी सांगतात, 'सुशीला त्रिपाठी ओरडत होत्या, आम्ही पिटबुलवर
दगडफेक करायला सुरुवात केली, पण तो थांबला नाही आणि लचके
तोडत राहिला. आम्ही सुमारे तासभर दगडफेक करत राहिलो, त्यानंतर
त्यांनी सुशीला यांचा मृतदेह ओढून आत नेला. सुमारे तासभर कुत्रा वृद्ध महिलेचे
लचके तोडत असल्याची माहिती आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84