Type Here to Get Search Results !

टायर फुटल्याने खासगी ट्रव्हल्स उलटली, 11 जखमी



पुणे दि. १२ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : नाशिकहून सोलापूरला येणाऱ्या खासगी ट्रव्हल्सचे पुढचे टायर फुटल्याने ट्रव्हल्स उलटून 11 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना सोलापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोलापूर-पुणे महामार्गावरील यावली फाटय़ाजवळ सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे. कल्पना सुभाष जैन, दर्शना जैन, प्रफुल चव्हाण, जय पटेल, सुनील हगलुरे अशी जखमींची नावे आहेत.

नाशिक ते सोलापूर राजयोग ट्रव्हल्सच्या बसमध्ये 30 प्रवासी होते. सोलापूर-पुणे महामार्गावर ही बस आली असता, अचानक बसचे पुढचे टायर फुटले. यामुळे चालकाचा ताबा सुटून बस उलटली. यात बसमधील 11 प्रवासी जखमी झाले असून, त्यातील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात अपघाताची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेच्या तीन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. त्यातील डॉक्टर आणि चालकांनी जखमींना बाहेर काढत त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना सोलापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.