पुणे, दि.२७ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): मालमत्तेवरुन
त्या सासु सुनेत वाद होता़. सासू मुलीकडे
गेल्याची संधी साधून सुनेने चक्क घराचा दरवाजाच बदलला़ त्याच्यावर स्वत:च्या
नावाचा फलक लावला़. घरातील साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचा प्रकार समोर
आला आहे़.
याप्रकरणी
हडपसर येथील गाडीतळजवळ राहणाऱ्या एका ६५ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात
फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी २६ वर्षाच्या सुनेवर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार १९ ते २३ जुलै दरम्यान घडला़.
याबाबत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची सुन यांच्यात मालमत्तेवरुन वाद आहे. फिर्यादी या
लहान मुलीसोबत त्यांच्या मोठ्या मुलीच्या घरी गेल्या होत्या. त्यादरम्यान
त्यांच्या सुनेने फिर्यादी यांच्या राहत्या घरात जबरदस्तीने प्रवेश करुन घराचा
दरवाजा बदलला. त्याच्यावर तिने स्वत:च्या नावाचा फलक लावला. घरातील लोखंडी
कपाटातील ९ तोळे ३ ग्रॅम सोने, ५७० ग्रॅम चांदीचे दागिने,
कागदपत्रे व रोख रक्कम असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन
नेला. सासुच्या तक्रारीनुसार सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस
उपनिरीक्षक गोसावी तपास करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84