पुणे, दि.१५ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली. तसेच एकाला अटक केली. वैभव लॉज मुंबई महामार्ग, किवळे, रावेत येथे बुधवारी (दि. १३) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
मोहम्मद बाशा शेख (वय ४५, रा. एमबी कॅम्प,
देहूरोड), असे अटक केलेल्याचे नाव आहे.
त्याच्यासह एका महिलेच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस
उपनिरीक्षक विजय लक्ष्मण कांबळे यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद
दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथील वैभव लॉज
येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलिसांच्या
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने कारवाई केली. यात दोन पीडित महिलांची सुटका
करण्यात आली. आरोपी हे पीडित महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेऊन
त्यातून मिळालेलया रकमेतून स्वत:ची उपजिविका भागवित असल्याचे तपासात समोर आले. या
कारवाईत दोन हजार ३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर
उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes