पुणे, दि.२२ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी शहीद भगतसिंग हे आतंकवादी होते, असे वक्तव्य केले. या वादग्रस्त वक्तव्यासाठी अशा खासदाराविरोधात वंदेमातरम् संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. खासदार मान यांनी जाहीर माफी मागावी, तसेच माफी न मागितल्यास केंद्र आणि पंजाब सरकारने त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी संघटनेद्वारा करण्यात आली. यावर कोणतीही पावले न उचलल्यास संघटनेतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. हे निषेध आंदोलन वंदे मातरम संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे यांच्या मार्गदर्शनाखाली झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक, जंगली महाराज रस्ता येथे करण्यात आले. या प्रसंगी संघटनेचे शहराध्यक्ष महेश बाटले, वरिष्ठ उपाध्यक्ष सूरज जाधव, कार्याध्यक्ष मोहित काकडे, उपाध्यक्ष आकाश गजमल आदी उपस्थित होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes