पुणे दि.२९ जुलै (चेकमेट टाईम्स): संपूर्ण महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या घडामोडी चालू असतानाच पुण्यात सुद्धा मोठी राजकीय घडामोड होताना पाहण्यात येत आहे. टिळक स्मारक ट्रस्ट कडून दरवर्षी लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पुरस्कार दिला जातो. दरवर्षी या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी असतात. परंतु यावर्षी या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित करण्यात आले असून ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. यावरुन पुण्याच्या राजकारणात रोहित टिळक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी रोहित टिळक यांनी
त्यांचा प्रदेश कार्यकारिणी पदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेस पक्षात एकाच
व्यक्तीकडे दहा वर्षापेक्षा अधिक काळ पद नको असे धोरण ठेवण्यात आले आहे. त्यानुसार
रोहित टिळक यांनी राजीनामा दिला आहे.
काँग्रेस कार्यकारिणी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहित
टिळक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यानंतर आता घरच्या
कार्यक्रमाला भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे.
त्यामुळे या चर्चांना पुष्टी मिळत आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes