पुणे दि. ११ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : अनेकांच्या आयुष्यात लग्नाआधी काही ना काही कारनामे झालेले असतात. त्यामुळे लग्नानंतर अनेक जण त्याची पुनरावृत्ती होऊ नये, किंवा त्याचा लग्नानंतरच्या आयुष्यावर परिणाम होऊ नये, यासाठी काळजी घेतात. मात्र, पुण्यातील एकाला लग्नाआधी घडलेला प्रकार लपवणे चांगलेच महागात पडले आहे. इतकेच नव्हे तर त्याला तुरुंगातही जावे लागले आहे.
पुण्यातील एका
तरुणाने बायकोपासून ट्रॅव्हल हिंस्ट्री लपविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर
आला आहे. या तरुणाचे नाव समदर्शी यादव असे आहे. तर झाले असे की, त्याच्या पासपोर्टमधील पाने
गहाळ झाल्यामुळे त्याला गुरुवारी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिकाऱ्यांनी
त्याला अडवले होते. यावेळी त्याने स्पष्टीकरण दिले की, मीच ही पाने फाडलीत. यानंतर
त्याला मालदीवच्या फ्लाईटमध्ये चढण्यापासून रोखण्यात आले आणि यानंतर त्याला सहार
पोलिसांनी अटक केली.
यावेळी त्याने
सांगितलं की, 2019 मध्ये लग्न करण्यापूर्वी त्याने त्याच्या बायकोपासून ट्रॅव्हल हिस्ट्री
लपविण्याचा प्रयत्न केला आणि पासपोर्टमधील किमान 10 पाने फाडली होती. समदर्शीने
पासपोर्टमधील पान नंबर 3 ते 6 आणि 31 ते 34 ही पाने नष्ट केली. त्यामध्ये तो
थायलंडला गेल्याची नोंद होती.
दरम्यान, त्याला शुक्रवारी अंधेरी
मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर केले गेले. यावेळी त्याची 25 हजारांच्या
जामिनावर सुटका करण्यात आली. त्याच्यावर आयपीसीच्या कलम 420, 465, 468 आणि 471 नुसार खोटे
कागदपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड वापरणे आणि पासपोर्ट कायद्याअंतर्गत गुन्हा
दाखल करण्यात आला.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes