पुणे, दि.२५ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरी आलेले पार्सल घेण्यास नकार दिल्यानंतर ते जबरदस्तीने घरात येऊन देण्यात प्रयत्न करण्यात आला. या कारणामुळे एका डिलिव्हरी बॉयवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी
३६ वर्षीय महिला ही बावधनमधील पाटीलनगर
मध्ये राहतात. त्यांना तीन वर्षाची मुलगीही आहे. मुलगीही त्यांच्यासोबत राहते.
तसेच त्या एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करतात. घटस्फोटासाठी त्यांचा आणि त्यांच्या
पतीमध्ये न्यायालयात वाद सुरू आहे.
याचदरम्यान, त्यांचे अॅमेझान कंपनीचे पार्सल आले आहे,
असा फोन त्यांना सिक्युरिटी गेटवरुन आला. तर यावेळी त्यांनी आपण कोणतेही
पार्सल मागविले नाही, असे सांगितले. तर इतकेच नव्हे कोणालाही
घरात पाठवू नका, असेही सांगितले.
मात्र, यानंतर काही वेळाने एक जण वर आला. त्याने
त्यांच्या घराची बाहेरील कडी काढली आणि आतील कडी काढू लागला. यादरम्यान, महिलेने दरवाजाचे आतील लॉक लावून पुन्हा गेटवरील सुरक्षारक्षकाला फोन
लावला आणि याबाबत विचारले. तर त्याने आपण ओळखीचा आहे, असे
सांगून आत गेल्याचे सिक्युरिटीने सांगितले. यानंतर फिर्यादी यांनी आरडा ओरडा केली
आणि बाजूच्या लोकांनी येऊन या डिलिव्हरी बॉयला पकडले. यानंतर पोलिसांना बोलावले.
डिलिव्हरी बॉयची चौकशी केली असता, तो म्हणाला की, या महिलेच्या पतीने आपल्या मुलीच्या
नावाने एक पार्सल पाठविले होते. मात्र, त्या घेत नसल्याने
परत घेऊन जाण्याऐवजी त्याने घरात डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान,
पती पत्नीच्या भांडणात डिलिव्हरी बॉयवर हिंजवडी पोलिसांत गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes