Type Here to Get Search Results !

राज्यात पाऊस घेणार विश्रांती; पुणे वेधशाळेने वर्तवला आणखीन एक अंदाज

 


पुणे, दि.१५ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. पुण्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक नदी-नाले, धबधबे दुथडी बनून वाहत आहेत. त्यामुळे अनेक अपघातं घडल्याचं समोर आलं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील गड, किल्ले, धबधबे अशा धोकादायक ठिकाणी पर्यटनास १७ जुलैपर्यंत बंदी आणली आहे. या परिसरात १७ जुलैपर्यंत कलम १४४ लागू असेल. तसेच पुणे जिल्ह्यातील पाच तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमधील शाळांना १४ ते १६ जुलैपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आता या महाप्रचंड पावसाबद्दल हवामान खात्याकडून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

अजून दोन दिवस महाराष्ट्रात मान्सून बरसणार आहे मात्र त्यानंतर संपूर्ण राज्यभरात पावसाचा जोर कमी कमी होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेचे संचालक डॉ. अमुपम कश्यपी यांनी दिली आहे. सध्या पुणे आणि घाट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. त्यामुळे अनेकांचं नुकसान झालं आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मात्र आता दोन दिवसांनंतर पाऊस उसंत घेणार असल्याची माहिती नक्कीच दिलासादायक आहे.

पुढेच दोन दिवस रायगड, पालघरमध्ये उद्याही रेड अलर्ट राहणार आहे अशी माहिती वेधशाळेच्या संचालकांनी दिली आहे. तसंच पूर्व विदर्भातही पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र अजूनही पावसाचा जोर कायम राहणार असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

येत्या काही दिवसांमध्ये पुणे, मुंबईत सर्वसाधारण पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर १६ तारखेपासून संपूर्ण राज्यात पाऊस कमी होईल असा सांगण्यात आलं आहे. असं असेल तरी कोकण आणि सह्याद्रिच्या घाट माथ्यावर माञ पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहितीही पुणे वेधशाळेने दिली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रिच्या घाट माथ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.