Type Here to Get Search Results !

भारतातही सापडला दुर्मीळ ब्लडग्रुप, जगात 'या' ब्लडग्रुपची केवळ १० माणसं

 


पुणेदि.१ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): आतापर्यंत आपल्याला रक्ताचे चार गट माहिती आहेत, ते म्हणजे A, B, O आणि AB. पण आता अजून एका दुर्मीळ रक्तगटाचा शोध लागला आहे. हो, तुम्ही बरोबर वाचत आहात. दुर्मीळ रक्तगट आढळला आहे तो पण आपल्या भारतात. 

गुजरातमधील राजकोटच्या 65 वर्षीय व्यक्तीच्या शरीरात हे दुर्मीळ रक्त असल्याचं समजलं आहे. या व्यक्तीला हृदयविकाराचा त्रास आहे. ऐतिहासिक गोष्ट म्हणजे दुर्मीळ रक्तगट असलेला हा भारताचा पहिला आणि जगातील 10 व्यक्ती आहे. याचा अर्थ असा की EMM Negative रक्तगट असणारे जगात फक्त 10 व्यक्ती आहेत. 

आपल्या शरीरात 42 वेगवेगळे प्रकारचे ब्लड सिस्टम्स असतात. ज्यात A, B, O, RH आणि डफी (Duffy) असं वेगवेगळे प्रकार असतात. मात्र साधारणत: 4 रक्तगट मानले जातात. तर EMM Negative हा रक्तगट 42 वा ग्रुप सिस्टम्स आहे. हा रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना ईएमएम हाय फिक्वेन्सी अँटिजनची कमतरता असते. विशेष म्हणजे या रक्तगटाचे लोकं ना रक्तदान करु शकतात आणि ना यांना दुसऱ्या कुठलाही रक्तगटाचे रक्त चालतं. 

सुरतमधील या रुग्णाला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे या रुग्णाची हार्ट सर्जरी करायची होती. मात्र या सर्जरीसाठी त्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासली. म्हणून त्याचा रक्ताची तपासणी केल्यावर या ईएमएम निगेटिव ब्लड ग्रुप अशा दुर्मीळ रक्तगटाची माहिती मिळाली. 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.