पुणे दि. १२ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : प्रियकरासोबत लॉजवर गेलेल्या प्रेयसीचा तीक्ष्ण
शस्त्राने गळा चिरून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. पुण्यातील स्वारगेट-सातारा
रस्त्यावरील शितल लॉजवर ही घटना घडली आहे. सकाळी रूमची साफ-सफाई करण्यास आलेल्या
कामगाराने रूमची पाहणी केली असता त्याला बाथरूममध्ये तरुणीचा रक्ताचा थारोळ्यात
पडलेला मृतदेह दिसून आला.
दिप्ती
काटमोडे (वय २४) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या
माहितीनुसार,
तरूणी व तिचा प्रियकर
दोघे रात्री लॉजवर आले होते.
दरम्यान, आज सकाळी नेहमीप्रमाणे रूमची साफ-सफाई करण्यासाठी लॉजचा
कामगार रूममध्ये गेला. त्यावेळी त्याला बाथरूममध्ये तरूणीचा रक्ताच्या थारोळ्यात
पडलेला मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्याने ही माहिती पोलीसांना दिली.
माहिती
मिळताच भारती विद्यापीठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिचा गळा चिरून
खून केल्याचे समोर आले आहे. माहिती घेतल्यानंतर दिप्ती तिच्या मित्रासोबत लॉजवर
रात्री आली असल्याचे समजले. पोलीसांकडून पसार झालेल्या त्या मित्राचा शोध घेतला
जात आहे.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत
आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84