पुणे दि.२९ जुलै (चेकमेट टाईम्स): सुमारे दीड वर्षापासून राजकीय आरक्षण गमावलेल्या इतरमागास वर्गीय [ओबीसी] समाजाला, जयंत बांठिया आयोगाच्या शिफारशी नुसार २७ % आरक्षण बहाल करण्यात आले. मागील २०१७ च्या मनापा निवडणुकीत पुण्यात १६२ जागा होत्या त्यावेळीही २७% च्या प्रमाणानुसार ४३.७४ म्हणजे ४४ जागांचे आरक्षण ओबीसी प्रवर्गाला मिळणे असे अपेक्षित होते, मात्र त्यावेळीही ओबीसींना १ जागा कमी देण्यात आली होती.
यावेळी ३४ गावे नव्याने मनापा मध्ये
समाविष्ट झाल्यामुळे नगरसेवकांची एकूण संख्या १७३ झाली आहे. १७३ जागांपैकी २७ %
जागा या ओबीसी समाजासाठी आरक्षित असणार आहेत, मात्र यावेळी सुद्धा टक्केवारीच्या प्रमाणत येणारी संख्या
अपूर्णांकात आहे, नियमानुसार ४६.७१ जागांवर ओबीसी
आरक्षण आहे. जेंव्हा अपुर्णांकी संख्या
०.५ पेक्षा अधिक असते तेंव्हा त्यापुढील
संख्या पूर्णांकात धरली जाते. ४६ पूर्ण
आणि ०.७१ ही अपूर्णांकी संख्या आहे . ०.७१ ही संख्या अर्ध्यापेक्षा अधिक मुल्यांची
असल्यामुळे, नियमा प्रमाणे १ पूर्ण जागा देणे अनिवार्य आहे. तरीही निवडणूक आयोग याही वर्षी ४७ जागा आरक्षित ठेवण्या ऐवजी ४६ जागीच ओबीसींना
आरक्षण दिले आहे.
आम आदमी पक्षाचे (आप) राज्य संघटक आणि
पुणे कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. बांठीया
आयोगाच्या अहवालाचे टंकलेखन सुरु असताना शिंदे -फडणवीस सरकार सत्तेवर आले.
सत्तेवर असताना ओबीसी आरक्षण मिळाले, हा धागा पकडून शिंदे - फडणवीस सरकारने ढोल ताशाच्या गजरात
पेढे वाटून आरक्षणाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. अपुर्णांक संख्येचे गणित
पुण्या बरोबरच अनेक ठिकाणी चुकत आहे, सर्वोच्च
न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी समाजाला आरक्षणाचा पुरेपूर लाभ मिळत नाही.
पुण्याप्रमाणे अनेक ठिकाणी अशी
परस्थिती आहे. अनेक ठिकाणी ओबीसी समाजाला
एक जागा कमी मिळत असेल, तर हा ओबीसी समाजावर अन्याय आहे , असे मत आपचे विजय
कुंभार यांनी व्यक्त केले आहे. मात्र श्रेयासाठी सगळ्यात पुढे असणाऱ्या राजकीय
पक्षांची या प्रश्नाबाबत अनास्था दुर्दैवी
आहे. आम आदमी पक्ष या प्रश्ना बाबत पाठपुरावा करून ओबीसी समाजाला संपूर्ण न्याय
मिळेपर्यंत लढत राहील, असे
आपचे राज्य संघटक आणि पुणे कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी स्पष्ट केले
आहे.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली
काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84