Type Here to Get Search Results !

बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे प्रयेजा सिटी भागातील रोडमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य



पुणे दि.१४ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : सतत पडणाऱ्या पावसामुळे वडगाव खुर्द येथील प्रयेजा सिटी ते मधूकोष रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, वाहतुकीस यामुळे अडचण होत असून नागरिकांना व वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.यामुळे मागील काही दिवसांपासून सतत होणाऱ्या पावसामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. प्रयेजा सिटी ते मधूकोष सोसायटी जवळील रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडल्याने या खड्ड्यामुळे  वाहन चालवताना लक्षात न आल्याने अपघात झाले आहे. या रस्त्याची खड्डयामुळे अक्षरशः चाळण झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.खड्डयांचा अंदाज न आल्याने अनेक वाहन चालकांचा अपघात झाल्याने शारीरिक दुखापती मुळे व वाहनाचे नुकसान झाल्याने नाहक भुर्दंड देखील बसत आहे.


प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असून उपाय योजना करण्यास मनपा कमी पडत असल्याचे नागरिकांचा सूर दिसून आले आहे.प्रशासनेने नागरिकांनच्या जीवाशी खेळू नये अशी नागरिकांनी मागणी केली आहे.लवकर मनपाने उपयोजना करून हा जीवघेणा खेळ थांबवावा.

"प्रयेजा सिटी ते मधूकोष सोसायटी जवळील रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला असून त्यामध्ये ५६जण पडले असल्याचे पोस्ट परिसरातील सोशल मीडियावर ग्रुपमध्ये फिरत असल्याने परीसरात नागरिकांन मध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परंतु आम्ही संबंधित खात्याशी संपर्क करून व प्रत्येक्ष पाहणी केली असता हा रस्त्याच्या मधोमध असणारा मोठा खड्डडा आहे .त्या मध्ये पडून अपघात देखिल झाले आहे परंतु किती अपघात झाले हे सांगता येणार नाही. मनपाने संबंधित रस्त्याची पाहणी केली असून सतत होणाऱ्या पावसामुळे काम करणे अवघड असल्याचे सांगितले परंतु पार्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे."

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.