पुणे, दि.२५ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): झोपेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार (प्रिस्किप्शन) झोपेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाच्या गोळ्यांचा वापर नशेसाठी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. अन्न आणि ओैषध प्रशासनाने (एफडीए) वाघोलीत कारवाई करून एका ओैषध विक्री दुकानातून सहा हजार गोळ्या जप्त केल्या असून ओैषध विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी वाघोली येथील साई
अरिहंत जेनरिकचे महावीर मनसुखलाल देसरडा (वय ३४) यांच्या विरोधात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सुहास सावंत यांनी
लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाघोली येथील साई अरिहंत जेनरीक दुकानात सावंत यांनी तपासणी केली. त्यांना
अल्प्रेक्स या औषधाच्या ६ हजार गोळ्यांची अज्ञातांना वाढीव दराने विक्री केल्याचे
आढळून आले. बीडमधील न्यू विहान मेडिकलच्या नावे बनावट बिले तयार केली. शासकीय
अधिकाऱ्यास बिलाची खोटी माहिती देऊन प्रशासनाची फसवणूक करुन दिशाभूल केल्याचे सावंत
यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
अल्प्रेक्स
या गोळ्या स्वस्त असून त्या प्रामुख्याने मानसिक विकार, चिंतेने ग्रासलेल्यांना डॉक्टरांकडून दिल्या जातात. या
गोळ्यांचा वापर नशेसाठी करण्यात येत असून बेकायदा जादा दराने या गोळ्यांची विक्री
केली जात आहे. या गोळ्यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने केला जातो. शस्त्रक्रियेनंतर
झोप येत नसेल तर या गोळ्या दिल्या जातात.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84