पुणे, दि.२३ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): बांधकाम व्यावसायिकासह दहा नागरिकांचे सोन्याचे ४०
तोळ्याचे दागिने दुरूस्तीसाठी घेऊन सराफाने पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला
आहे. पुण्यातील उत्तमनगर परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी सुनिल जगदीश वर्मा
(वय ४१, रा.
वेस्ट कोस्ट, शिवणे) याच्यावर उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल केला आहे. याबाबत सोमनाथ मार्तंड इंगवले (४१) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ इंगवले हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तर संशयित आरोपी सुनिल वर्मा याचे शिवणे येथील नांदेडसिटी रोडवर स्वामी सानिध्य विहारमध्ये गणराज ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. सुनिल वर्माने इंगवले यांची फसवणूक करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून अडीच लाखांचे दहा तोळे सोन्याचे दागिने दुरूस्त करून देण्याचे बहाण्याने घेतले. त्याचबरोबर त्यांच्याच परिचयाचे आकाश घुले, तुषार नाणेकर तसेच इतर आठ ते दहा जणांकडून तब्बल ४० तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने दुरूस्तीसाठी म्हणून घेतले. पण, अचानक सराफ दुकानाला टाळे ठोकून पसार झाला. तक्रारदार दागिने आणण्यासाठी दुकानात गेले असता त्यांना दुकान बंद असल्याचे दिसून आले. त्यांनी त्याच्याशी संपर्क केला. पण, संपर्क झाला नाही. अधिक तपास यु. डी. रोकडे हे करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84