पुणे, दि.३० जुलै (चेकमेट टाईम्स): मुळशीत पुन्हा आरक्षण सोडत होणार. तालुक्यातील अनुसूचित जाती
महिलासाठी असलेले आरक्षण भुगाव गणात जाहीर करण्यात आले होते. मात्र, हे आरक्षण लोकसंख्येच्या आधारे दुसर्याच गटात देण्यात यावे याकडे
लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे फक्त भुगाव गणाची आरक्षण सोडत होणार? की तालुक्यातील सर्व जागांचे आरक्षण सोडत होणार याकडे सर्वांचे लक्ष
लागले आहे.
पौडला पंचायत
समितीच्या सेनापती बापट सभागृहात तहसीलदार अभय चव्हाण यांनी गुरुवारी (दि.29 जुलै)
आरक्षण सोडत जाहीर केली. या वेळी जिल्हा पुरवठा निरीक्षक सुरेखा माने, निवासी नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ, सरिता पाटील, गटविकास अधिकारी संदीप जठार आदी
उपस्थित होते. अनुसूचित जाती महिला जागेची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.
अनुसूचित जातीची सर्वांधिक मते हिंजवडी गणात 2625 यासह भूगावमध्ये 2286 आणि
माणमध्ये 2182 मतदार आहेत. वास्तविक आयोगाच्या सूचनेनुसार गणाच्या रचनेत पन्नास
टक्क्यांपेक्षा जास्त बदल झाल्यास त्याठिकाणी नव्याने आरक्षण टाकले जाते; पण बदलत्या गणरचनेत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी बदल झाला असल्यास सन 2002
ते 2017 पर्यंतच्या निवडणुकीतील आरक्षणाचाही विचार केला गेला पाहिजे.
भूगाव या
नव्याने झालेल्या गणातून बावधन हे गाव वगळले गेले. यासह हिंजवडी गणदेखील बदलला
असून त्यातील म्हाळुंगे गाव पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आले आहे. परंतु, भूगावची फेररचना करताना त्यात पन्नास टक्क्यांपेक्षा
कमी बदल झाला आहे. यापूर्वी हा गण अनुसूचित जातीसाठी राखीव होता. त्यामुळे या गणात
पुन्हा तेच आरक्षण पडू शकणार नाही. तहसीलदार चव्हाण यांनी जिल्हाधिकार्यांची भेट
घेऊन आयोगाला याबाबत कळविले आहे. आयोगानेही ही बाब मान्य केली असून, येथे आयोगाकडून तारीख कळविल्यानंतर फेरआरक्षण करण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84