पुणे दि.२९ जुलै (चेकमेट टाईम्स): पुण्यातील
शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवाच्या दीप
अमावस्येनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी
परिचित असलेले कालीचरण महाराज हे उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी राज्याचे
नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं.
कालीचरण महाराज म्हणाले की, इथे येऊन खूप चांगलं वाटलं. आयोजकांनी खूप चांगलं कार्यक्रम घेतला. पुढच्या वर्षी अधिक प्रसन्नता वाटेल अशी आशा आहे. श्रावण सुरू झाला असून सगळ्यांनी शिवाची आराधना करावी, अस आवाहन त्यांनी केलं. दरम्यान सर्वांनी सुख-समृद्धी प्राप्त करून घ्यावी. तसेच हिंदू संस्कृतीच्या उत्थानासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवतार भूलोकावर येवो आणि हिंदू संस्कृतीचे रक्षण करावे, अशी प्रार्थना शिवाच्या चरणी करावी असही कालीचरण महाराज म्हणाले.
राज्यातील हिंदुत्ववादी सरकारला आमचा पाठिंबा आहे. आता उद्धव ठाकरे यांना
सल्ला देऊन काय फायदा असं म्हणतानाच कालीचरण महाराज यांनी ''शिंदे साब बढीया काम कर रहे है' असं म्हणत कौतुक केलं. त्यांनी दोन शहरांचं नामांतर केलं.
वास्तविक पाहता ते नामांतर नसून पूर्वीची नावं त्यांनी शहराला दिल्याचं कालीचरण
महाराज यांनी नमूद केलं. शिंदे सरकारने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर
उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
दरम्यान हिंदूंच्या अस्मितेचा विजय होईल, अशा राजांनी निरंतर सत्तेत बसाव. एकनाथ शिंदे यांना
हार्दिक शुभेच्छा. मला आनंद आहे की शिंदे सरकार आलं. हिंदुत्ववादी लोकांनीच सत्तेत
बसाव हा आमचा अजेंडा असल्याचं म्हटलं आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84