दि. 04
जुलै २०२२
(चेकमेट टाईम्स): पुण्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली
आहे. ससून रुग्णालयात प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेच्या
दीराने तिच्या मुलांसोबतच दुष्कृत्य केल्याची घटना घडली. याप्रकरणी लोणी काळभोर
पोलिसांनी 30 वर्षांच्या आरोपी काकाला अटक
केली आहे. या घटनेने पुणे हादरलं आहे.
पुण्यातील एका 30 वर्षीय महिलेचा पती घर सोडून
निघून गेला आहे. ती वडकी परिसरात राहते. ती प्रसूतीसाठी ससून रुग्णालयात दाखल झाली
होती. तर घरी तिचा ८ वर्षांचा मुलगा आणि ४ वर्षांची मुलगी एकटेच होते. मात्र, यावेळी अत्यंत संतापजनक घटना घडली.
दीर त्यांना घेऊन स्वत:च्या घरी गेला होता. तर दुसरीकडे या महिेलेला मुलगा झाला.
घरी आल्यावर तिने मुलीची व मुलाची अवस्था पाहिल्यावर चौकशी केली असता धक्कादायक
माहिती समोर आली.
वडकी येथे राहणाऱ्या या महिलेला पहिल्या
पतीपासून एक मुलगा (वय ८) व मुलगी (वय ४) आहे. आता ती मागील 5 महिन्यांपासून
दुसऱ्या पतीबरोबर राहते. मात्र, आता
गेल्या 4 महिन्यांपासून तिचा दुसरा पती घर सोडून निघून गेला आहे. आपली उपजीविका
भागवण्यासाठी ती भंगार गोळा करते. ती गर्भवती असल्याने आता तिचे दिवस भरत आले.
यामुळे ती तिच्या मुलांना शेजाऱ्यांकडे सोपवून ससून रुग्णालयात 20 मे रोजी दाखल
झाली. यानंतर तिला मुलगा झाला. रुग्णालयातून तिला 23 मे रोजी सोडण्यात येणार
असल्यामुळे तिने मोठ्या दिराला फोन करून बोलावले. यानंतर त्यांनी तिला वडकी येथील
घरी सोडले. यावेळी शेजारी चौकशी केल्यावर तिचा धाकटा दीर मुलांना घेऊन त्याच्या
घरी गेल्याचे तिला समजले. दुसऱ्या दिवशी या महिलेने तीन पिंपळमळा येथून आपल्या
मुलांना घरी आणले. मात्र, मुलांच्या
अंगावर वळ दिसल्याने तिने दिराला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
यानंतर दुसऱ्या दिवशी मुलांना आंघोळ घालताना मुलीबाबत काहीतरी वाईट घडल्याचे तिच्या
लक्षात आले. तिने चौकशी केल्यावर छोट्या काकाने अत्याचार केल्याचे चार वर्षांच्या
मुलीने सांगितले. तसेच त्याचा खूप त्रास होत असल्याचेही तिने सांगितले. तर सोबतच
मुलाबाबतही हाच प्रकार घडला होता. त्याच्यावर काकाने अनैसर्गिक अत्याचार केला
होता.
या दोघांनी सांगितलेल्या हकीकतीने तिच्यावर जणू
आभाळच कोसळले. तिने लोणी काळभोर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या 30 वर्षांच्या
आरोपी काकाला अटक केली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस तपास करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया
असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती
आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात
आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84