दि. 02 जुलै २०२२
(चेकमेट टाईम्स): विधानपरिषदेच्या निकालानंतर व्हाया सुरत
गुवाहाटी येथे मुक्कामी गेलेल्या एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी रेडिसन ब्लू या
हॉटलचे संपूर्ण बिल दिल्याचं सांगितले जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेशी बंडखोरी
केल्यानंतर एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू
हॉटेलमध्ये आठ दिवस मुक्काम होते. बुधवारी चेक आऊट करताच या सर्वांनी हॉटेलचे बिलं दिल्याचं एका हॉटेल कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, आठ दिवसांचे बिल नेमकं किती आले याचा आकडा या
कर्मचाऱ्याने सांगण्यास नकार दिला. असे असले तरी, ही
रक्कम 68 ते 70 लाख
रुपयांच्या दरम्यान असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
बंडखोरी केल्यानंतर या सर्व आमदारांच्या
वास्तव्यासाठी गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलची निवड करण्यात आली होती. एवढेच
नव्हे तर, हॉटेल बुकिंगवेळी येथे असणाऱ्या
सर्वच्या सर्व म्हणजेच 70 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. तसेच
हॉटेलचे रेस्टॉरंट, बॅक्वेटसह इतर सुविधा बाहेरील
लोकांसाठी 22 ते 29 जून
या कालावधीत संपूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील
सर्व आमदार सामान्य पाहुण्याप्रमाणे याठिकाणी थांबले होते असेही हॉटेलमधील एका
वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. तसेच या सर्वांनी हॉटेल
सोडण्यापूर्वीच संपूर्ण बिल भरल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितले.
या हॉटेलमध्ये आमदार ज्या रूम्समध्ये थांबले होते
त्या सुपीरियर आणि डिलक्स श्रेणीतील होत्या. रेडिसन ब्लूच्या वेबसाइटनुसार, गुवाहाटी येथील या हॉटेलच्या खोल्यांचे भाडे
डायनामिक असून यामध्ये जवळजवळ दररोज बदल केला जातो. सामान्यत: सुपीरियर रूमचे भाडे
सुमारे 7500 च्या आसपास तर, डिलक्स रुमचे भाडं दररोज 8500 रुपये असते असे सूत्रांनी सांगितले. या
हॉटेलमध्ये काही डिलक्स आणि सुमारे 55 सुपर
डिलक्स रूम आहेत. या सर्व रुमचे आमदारांच्या आठ दिवासांचे भाडे डिस्काउंट आणि
टॅक्स मिळून अंदाजे 68 लाख तर जेवणाचे बिल सुमारे 22 लाख रुपये आल्याचे समजते.
हॉटेल कर्मचार्यांना विचारण्यात आले की, येथे राहणाऱ्या आमदारांनी इतर कोणत्याही सशुल्क
सेवेचा लाभ घेतला का? यावर कर्मचार्याने सांगितले की, आमदारांनी केवळ कॉम्पिमेंट्री सुविधांचाच लाभ
घेतला. याशिवाय स्पा किंवा अन्य कोणत्याही सेवेचा लाभ घेतला नाही. 22 जून रोजी सकाळी मुंबईपासून सुमारे 2700 किमी अंतरावर असलेल्या या हॉटेलात सर्व
आमदारांनी एन्ट्री घेतली होती. त्यानंतर 29 जूर
रोजी बुधवारी हे लोक हॉटेलमधून बाहेर पडले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84