दि. 04 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): संत
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे फलटण नगरीत मोठ्या उत्साहात स्वागत झाले. माऊलींचा
मुक्काम फलटण शहरातील विमानतळ मैदानावर असताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या
वतीने वारकऱ्यांच्या वेषात फिरणाऱ्या तसेच संशयित रित्या फिरणाऱ्या चोरट्यांना
लक्ष करून कारवाई करण्याचे काम केले. विशेष म्हणजे सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व
कर्मचारी हे या ठिकाणी वारकरी वेशातच पाहायला मिळाले. वारकरी वेषात पोलिसांनी
लोणंद पासून फलटणपर्यंत 44 चोरटे
पकडले. यामध्ये नऊ महिलांचा समावेश आहे.
संतश्रेष्ठ
श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम यंदा सातारा जिल्ह्यात सहा दिवस आहे.
आज सकाळच्या सुमारस पालखी सोहळा फलटणहून बरड येथे मार्गस्थ झाला. या मुक्काच्या
कालावधीत वारकऱ्यांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा आरोग्य विभागातर्फे
विविध पथके तैनात करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून वारकऱ्यांची आरोग्य
तपासणी करुन त्यांना जाग्यावरच औषधोपचार केले जात आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज
पालखी सोहळ्यात वारक-यांचे मौल्यवान साहित्य चोरीस जाऊ नये, विविध ठिकाणी होणा-या छोट्या आणि मोठ्या
चो-या रोखण्यासाठी सातारा पोलीस दलाने विशेष खबरदारी घेतली आहे.
सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस वारकऱ्यांच्या वेषात पालखी सोहळ्यात
फिरत आहेत. संबंधित पोलीस संशयित रित्या फिरणाऱ्यांवर लक्ष ठेवतात. त्यानंतर पोलीस
संबंधिताची चौकशी करुन त्याच्याकडील असलेले साहित्याबाबत विचारण करताना त्यांना
काही शंका आल्यास त्यास पोलीसी खाक्या दाखविला जातो. त्यातून 44 चोरटे पोलीसांनी
जेरबंद केले. नातेपुतेकडून फलटण तसेच फलटण ते नातेपुते दिशेने होणारी सर्व
वाहतुक बंद आहे. फलटण ते लोणंद, फलटण ते दहिवडी , फलटण ते सातारा वाहतुक चालू आहे असे सातारा पाेलीस दलाने कळविले
आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर
उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया
असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती
आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात
आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84