पुणे, दि.२१ जुलै २०२२ (चेकमेट
टाईम्स): स्वतःला माहिती अधिकार कार्यकर्ता
असल्याचे सांगत राष्ट्रीय महामार्गाचे काम करणार्या एका कॉन्ट्रॅक्टरकडे दोन कोटी
रुपयांच्या खंडणीची मागणी करून, 25 लाखांचा पहिला हप्ता घेताना शिरूरमधील
पेट्रोल पंप मालकाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने रंगेहात पकडले. माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करत विविध प्राधिकरणाकडे तक्रार करण्याच्या
धमकीने माहिती अधिकार कार्यकर्ता खंडणी उकळू पाहत होता. दत्तात्रय गुलाब फाळके (वय
46, रा. तळजाई पठार, धनकवडी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टरने दिलेल्या
फिर्यादीनुसार पोलिसांनी फाळके याच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात
खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.19) दुपारी पावणेचारच्या
सुमारास घडली.
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी
हे कॉन्ट्रॅक्टर असून, राष्ट्रीय महामार्गाचे काम करतात. नगर
जिल्ह्यातील जामखेड परिसरात त्यांच्या कंपनीकडून रस्त्याचे काम करण्यात येत आहे.
आरोपी फाळके ठेकेदाराला भेटला. तुमच्या कंपनीकडून बेकायदा उत्खनन करण्यात आले आहे.
परवानगी घेण्यात आल्या नाहीत तसेच उत्खननाचे शुल्क भरण्यात आले नाही. त्यामुळे
दंडात्मक कारवाई टाळायची असेल तर दोन कोटी रुपये द्यावे लागतील, अशी धमकी फाळकेने त्यांना दिली. फाळकेने माहिती अधिकार कार्यकर्ता
असल्याचे सांगून ठेकेदाराला धमकावण्यास सुरुवात केली. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरने खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस
निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याकडे तक्रार दिली.
त्यानुसार अपर
पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त
श्रीनिवास घाडगे यांच्या सुचनेनुसार पथकाने पुणे-सातारा रस्त्यावर सापळा लावला.
कॉन्ट्रॅक्टरने खंडणीचा पहिला हप्ता घेण्यासाठी फाळकेला कदम प्लाझा इमारतीजवळ
बोलावले. त्यावेळी 25 लाखांची खंडणी घेताना फाळकेला पथकाने रंगेहात पकडले. सहायक
निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण,
कर्मचारी शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर यांच्या पथकाने ही
कारवाई केली.
फाळके हा
शिरूरमधील असून, त्याचा
पेट्रोल पंप आहे. धनकवडीत त्याचे गॅसच्या शेगड्यांचे दुकान आहे. तो कॉन्ट्रॅक्टरला
विविध प्रकारच्या धमक्या देऊन खंडणीची मागणी करीत होता. दोन कोटींची मागणी
केल्यानंतर 25 लाख रुपये घेताना त्याला रंगेहात पकडले आहे.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84