पुणे दि. 0९ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) :
पुणे
शहरातील विविध पोलीस ठाण्यातंर्गत तब्बल 21 गुन्हे दाखल असलेल्या तडीपार सराईताला
युनिट एकने कसबा पेठ परिसरातून अटक केली आहे. काही महिन्यांपुर्वी त्याला पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे
जिल्ह्यातून दोन वर्ष तडीपार करण्यात आले होते. मात्र, कोणत्याही परवानगीशिवाय तो पुन्हा शहरात येताच, गुन्हे शाखेच्या युनीट एकने त्याला जेरबंद केले. योगेश बाबुराव
पाटणे (वय 32 रा. कसबा पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
सराईत योगेश
गुन्हा करण्याच्या उद्देशाने कसबा पेठ परिसरात असल्याची माहिती युनीट एकला मिळाली.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक
संजय गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने
तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याचे उघडकीस आले. पुढील कारवाईसाठी त्याला फरासखाना
पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त
रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ
निरीक्षक संदिप भोसले, उपनिरीक्षक
संजय गायकवाड, अमोल पवार, इम्रान शेख, अजय थोरात, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, निलेश साबळे यांनी केली.
सराईत
पाटणेविरूद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडयाची तयारी, गंभीर दुखापत, मारामारी, हत्यार बाळगणे, अपहरण,बलात्कार, विनयभंग, तडीपार आदेशाचा भंगाचे एकूण 21 गुन्हे दाखल आहेत. त्याला 2017
मध्येही दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. त्यानंतर काही महिन्यांपुर्वी
पाटणे याला पुन्हा दोन वर्ष तडीपार करण्यात आले. मात्र, गुन्हा करण्यासाठी तो कसबा पेठेत आल्याचे समजताच पोलिसांनी
त्याला अटक केली.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84