पुणे दि. १२ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : एकाचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. एसटी बस आणि इको कार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. तर एसही बसही अपघातानंतर थेट शिवारात घुसल्याचं पाहायला मिळालं. या अपघातानंतर अहमदनगर-कल्याण महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. रात्री झालेल्या अपघातामुळे बचावकार्य करतानाही अडथळा येत होता. दरम्यान, स्थानिकांनी तातडीनं अपघात झालेल्या ठिकाणी धाव घेतली आणि मदतकार्य केलं आहे. एका 48 वर्षांच्या महिलेचा या अपघातामध्ये जीव गेला आहे.
नगर-कल्याण महामार्गावर जु्न्नर तालुक्यात एसटी बसचा अपघात झाला. एसटी बस
आणि इको कार यांच्यात समोरसमोरच भीषण धडक झाली. जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील
शिवारात एसटी बस घुसली होती. तर रस्त्यावरच इको कारचा चक्काचूर झाला होता. या
अपघातानंतर एकच गोंधळ उडाला. बसमधील प्रवाशांचीही या अपघातात घाबरगुंडी उडाली
होती. गुलशन शकील चौगुले असं या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या 48 वर्षीय
महिलेचं नाव आहे. या महिलेच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला
आहे.
या अपघातामध्ये चार जण थोडक्यात बचावले असले,
तरी गंभीररीत्या
जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नेमका हा अपघातात चूक कुणाची होती, हे कळू शकलेलं नाही. मात्र गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला
असावा, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. इको कार आणि एसटी बस
यांच्या धडक झाल्यानंतर ही बस थेट शिवारात घुसली होती.
सध्या महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा जोर कायम आहे. अशातच पावसात दृश्यमानता
कमी होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनं हाकतात अधिक सतर्कता बाळगावी आणि पावसात
वाहनं वेगानं हाकू नयेत, असं आवाहन करण्यात
येतंय.
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84