Type Here to Get Search Results !

वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे पुण्यात हरवलेली १२ वर्षीय संस्कृती घरी सुखरूप पोहोचली.

 


पुणे, दि.३० जुलै (चेकमेट टाईम्स): मार्केट यार्डच्या सर्किट हाउस चौकात रस्ता चुकलेल्या मुलीला पोलिसांच्या सतर्कतेमुळे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात यश आले. कोरेगाव पार्क वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी रस्ता चुकलेल्या मुलीला पालकांचा तात्काळ शोध घेऊन मदत केली.

गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अंदाजे १२ वर्षाची एक लहान मुलगी सर्किट हाऊस चौकात घाबरलेल्या स्थितीत उभी होती. यावेळी कोरेगाव पार्क वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटके व पोलीस अंमलदार यांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने संस्कृती प्रकाश गोठे (वय १२ रा. आनंदनगर झोपडपट्टी, गंगाधाम चौक, मार्केट यार्ड) असे स्वतःचे नाव व पत्ता सांगितला. घाबरलेल्या संस्कृतीला धीर देऊन विचारपूस करत पूर्ण माहिती घेतल्यावर तत्काळ सापडलेल्या मुलीची माहिती वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली.

कोरेगाव पार्क वाहतूक शाखेत कार्यरत असणारे पोलीस अंमलदार यांनी सापडलेल्या मुलीची माहिती मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथील पोलिसांना दिली. मार्केट यार्ड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी भाऊ तनपुरे यांनी तत्काळ मुलीच्या घरी जाऊन पालकांचा शोध घेऊन मुलगी कोरेगाव पार्क वाहतूक विभाग या ठिकाणी असल्याची माहिती दिली. त्यानंतर तिच्या आजी कविता गोठे यांनी कोरेगाव पार्क वाहतूक विभाग येथे येऊन स्वतःच्या नातीला ताब्यात घेतले.

वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटके, हवालदार रमजान खान, नाईक नवनाथ मोहिते, महिला शिपाई सविता रोकडे यांनी तात्काळ दाखवलेल्या सतर्कतेमुळे हरविलेल्या नातीला आजीपर्यंत पोहोचविण्यास मोठी मदत झाली. या घटनेमुळे सुरुवातीला लहान मुलगी देखील घाबरलेली होती. पोलीस काकांनी तिला धीर देऊन आजी येईपर्यंत तिची काळजी घेतली. रस्ता चुकलेल्या मुलीला सुखरूप ताब्यात दिल्याबद्दल गोठे कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.