पुणे दि.१४ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांकडून महापालिकेच्या
कारभारावर टीकेची झोड उठत असल्याने खुद्द महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनाच
रस्त्यांची पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे. मध्यवर्ती भागातील टिळक
रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्त्यासह सिंहगड रस्ता परिसरातील रस्त्यांची
दुरावस्था आयुक्तांनी स्वतः अनुभवली.
रस्त्यांची झालेली चाळण, ठिकठिकाणी साचणारे पाणी, बिघडलेल्या चेंबर्सची लेव्हल व त्यामुळे नागरिकांचे होणारे हाल
याचे दर्शन आयुक्तांना झाले. रस्त्यावर पडलेली खडी काढून घ्या, खड्डे बुजवा असे आदेश आयुक्तांनी दिले. तर दुसऱ्या
बाजूला आता पावसाळ्यापूर्वी ठेकेदारांनी केलेल्या रस्त्याची माहिती अतिरिक्त
आयुक्तांनी मागवली असून, निकृष्ट
दर्जाची कामे करणाऱ्या या ठेकेदारांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन डॉ. कुणाल
खेमणार यांनी दिले आहे. आज दिवसभरात शहरातील केवळ ८८ खड्डे बुजविण्यात आले आहेत.
आठवड्याभरापासून शहरांमध्ये पावसाचा चांगला जोर धरला आहे. या
पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांची चाळण झालेली आहे. मार्च महिन्यात आर्थिक वर्ष
संपणार असल्याने अंदाजपत्रकातील निधी वाया जाऊ नये यासाठी गडबडीत अनेक ठिकाणी
रस्ते करण्यात आले. त्यांची बिलेही काढण्यात आली आहेत. अशा पद्धतीने अनेक
रस्त्यांचे डांबरीकरण झाले. पण यांचा दर्जा चांगला नसल्याने अवघ्या तीन
महिन्यांमध्ये खड्डे पडून रस्त्यांची चाळण झालेली आहे. सांडपाणी व पावसाळी
गटारांच्या चेंबरच्या बाजूने खड्डे पडले आहेत. पाणी वाहून जाण्यासाठी योग्य उतार न
केल्याने एकाच जागी पाणी थांबत आहे.
रस्त्यांची चाळण
झाल्याने नागरिकांकडून अनेक तक्रारी येत होत्या महापालिका आयुक्त विक्रम कुमार
यांनी आज लक्ष्मी रस्ता, टिळक
रस्ता, बाजीराव रस्त्यावरील जागांची
पाहणी केली. सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी, आनंदनगर, प्रयेजा सिटी या परिसरातील रस्त्यांची आयुक्तांनी पाहणी
केली. अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, पसरलेली
खडी पाहून हे रस्ते लगेच दुरुस्त करून घ्या, अपघात
होणार नाहीत गाड्या घसरणार नाहीत या दृष्टीने उपयोजना करा अशा सूचना दिल्या.
ठेकेदारांकडून शहरातील
अनेक रस्ते करून दिले आहेत. त्यांचा दोष दायित्व कालावधी (डिफेक्ट लायबिलिटी
पिरियड) संपलेला नाही अशा रस्त्यांवरही खड्डे पडल्याच्या तक्रारी येत आहे. नुकतेच
पावसाळ्यापूर्वी जेथे ठेकेदारांनी कामे केली तेथेही लगेच खड्डे पडले आहेत. हे खड्डे
ठेकेदारांकडून दुरुस्त करून घ्यावेत. तसेच त्यांच्या निविदेतील अटी शर्तीनुसार दंड
वसूल करावा, तसेच शर्तीचा भंग केल्याने
ठेकेदारांवर कारवाई चा प्रस्ताव तयार करा. तसेच पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामांची
माहिती लगेच सादर करा असे आदेशाचे पत्र अतिरिक्त आयुक्त खेमणार यांनी पथ विभाग
प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांना दिले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली
काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84