पुणे दि. १२ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : रायगड जिल्ह्यातील उमरठमध्ये तानाजी
मालुसरे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणून ओळखलं जाणारे आंब्याचं झाडे कोसळले.
सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हे झाड मुळापासून उन्मळून पडले. तानाजी
मालुसरे यांनी स्वत: हे झाड लावले होते, असे
सांगितले जात आहे. झाडाच्या ढोलीत शिवकालीन शस्त्रे देखील सापडल्याचे सांगितले जात
आहे. हे ऐतिहासिक झाड कोसळल्याने शिवप्रेमी
हळहळ व्यक्त करत आहेत.
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या
कर्मभूमी उमरठ येथील ऐतिहासिक महत्त्व असलेले शिवकालीन आंब्याचे झाड जोरदार
पावसामुळे काल दुपारी जमीनदोस्त झाले. या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही.
मात्र, काही प्रमाणात स्मारकाच्या तटबंदीचे
नुकसान झाले आहे.
नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या
स्मारकात एक आंब्याचे झाड होते. हे साडे तीनशे वर्ष जुने झाड होते. काही
वर्षांपूर्वी आंब्याची डहाळी तुटली असता त्यातून तलवारी पडल्या, असे सांगितले जात आहे. त्यातील दोन तलवारी येथे असून बाकीच्या
तलवारी पुणे येथे नेल्या आहेत. हे झाड
तानाजी मालुसरे यांचा इतिहासाची साक्ष होते, अशी चर्चा
आहे. पावसामुळे कोसळलेले हे आंब्याचे झाड
हटविण्याचे काम नरवीर रेस्क्यू टीम तर्फे युद्ध पातळीवर सुरु आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर
उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84