पुणे दि. ११ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : भावजयीला गावठी कट्टा
दाखवताना दिराकडून ट्रिगर ओढलं गेल्याने गोळी थेट भावजयीच्या डोक्यातून आरपार
झाल्याची धक्कादायक घटना घडली. अहमदनगर जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.गंभीर
जखमी झालेल्या भावजयीवर रुग्णालयात उपचार उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला असून
फरार झालेल्या आरोपी दिराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे गुरुवारी (७ जुलै) सकाळी ही घटना घडली आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शी कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल भालेराव हा महिलेचा दिर आहे. त्याने बाहेरून गावठी कट्टा आणला होता. हा गावठी कट्टा भावजयी सुनिता भालेराव (वय ३२) यांना दाखवत असताना आरोपीकडून ट्रिगर ओढला गेला आणि गोळी सुनिता भालेराव यांच्या डोक्यात आरपार घुसली. घटना घडल्यानंतर आरोपी दिर घटना स्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती
समजताच शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील, पोलीस हवालदार नितीन सानप, रमेश शेख, बाळकृष्ण वर्पे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
रक्ताच्या
थारोळ्यात पडलेल्या सुनिता यांना आगोदर खाजगी रुग्णालयात, त्यानंतर शिर्डी आणि नंतर लोणी येथील
प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गोळी थेट डोक्यातून आरपार
घुसल्याने सुनिता भालेराव या गंभीर जखमी झाल्या होत्या. दरम्यान, आरोपीचा शोध घेण्यासाठी शिर्डी पोलिसांचे
पथक रवाना झाले. मात्र, उपाचार सुरू असताना
सुनीता भालेराव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर फरार झालेला आरोपी दिर विशाल
भालेराव याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.
आरोपीकडून चुकून
गोळी सुटली की मारली अशा चर्चांना उधाण आले आहे. आरोपीकडे अनधिकृत गावठी कट्टा आला
कुठून? आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आहे का? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. या
घटनेने कोपरगाव तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84