पुणे दि. ११ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : भीमाशंकरहून पुण्याकडे जात
असताना मंचर (ता. आंबेगाव) येथील उजव्या कालव्यात कार (एमएच 12 एझेड 1635) कोसळली.
मंचर पोलिस व मोरडे फुड्स कंपनीतील कर्मचार्यांनी तातडीने मदत केल्यामुळे कोथरूड
(पुणे) येथील तिघे जण बचावले. भीमाशंकर येथे दर्शन घेऊन पुण्याकडे जात असताना मंचर
नजित अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे उजव्या कालव्यालगतच्या रस्त्यावरून कार
कालव्यात कोसळली.
पवन महेश पाठक
(वय 41), शोभा महेश पाठक (वय 61, दोघे रा. भागीरथी टॉवर, कोथरूड, पुणे) पुष्पा महावीर दुबे
(वय 76, खंडोबा, मध्य प्रदेश) हे गाडीत जात
होते. ही दुर्घटना पाहून जवळच असलेल्या चेतन कराळे ,विकास मोरडे, अनिल वाणी, मंचर ठाण्याचे पोलिस
हवालदार तानाजी हगवणे, पोलिस जवान योगेश रोडे यांनी पाण्यात उतरून तिघांनाही
सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. क्रेनच्या साह्याने रात्री
साडेनऊ वाजता कार बाहेर काढण्यात आली आहे. तिघांची प्रकृती उत्तम असल्याचे
पोलिसांनी सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84