पुणे दि. 0९ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : पाण्याच्या उघड्या टाक्या लहान मुलांसाठी
मृत्यूचा सापळा बनत आहेत. तर याच उघड्या टाक्या आता जनावरांचा जीव देखील धोक्यात
घालत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे एक गाय पाण्याच्या टाकीत पडली
अग्निशमन दलाच्या जवानांनी या गाईला सुखरूप बाहेर काढले. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात एका बांधकाम साईटवर ही घटना
घडली आहे. या घटनेमुळे पाण्याच्या उघड्या टाक्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला
आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही गाय अचानक या टाकीत
पडली. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात अनेक प्रकल्पांचे
बांधकाम सुरू आहे. बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या एका पाण्याच्या टाकीत ही
गाय पडली. स्थानिकांनी तात्काळ या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन
दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत गाईला बाहेर काढले.
ही गाय या परिसरात फिरत असताना अचानक या पाण्याच्या टाकीत पडली.
बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी काम करत असलेल्या मजुरांच्या निदर्शनास ही बाब आली.
त्यांनी तात्काळ अग्निशमनदलाशी संपर्क साधून मदत मागितली. अग्निशमन दलाचे जवान
तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गाईला वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू
केले.
टाकी खोल आणि निमुळती असल्यामुळे गाईला बाहेर काढण्यात अडचणी
येत होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी टाकीचे गज कापून गाईला बाहेर काढण्यात
काढण्याचे प्रयत्न केले. गज कापल्यानंतर गाईला बाहेर काढणे सोपे झाले. गाईच्या
शिंगाला दोरी बांधून अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत सावधगिरीने या गाईला सुखरुप
बाहेर काढले. तब्बल दोन तास अग्निशमन दलाचे हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते.
अखेरीस गाईला जिवंत बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना
यश आले. अग्नीशमन दलाच्या जवानांमुळे गाईला जीवदान मिळाले आहे. पुण्यात अनेक
ठिकाणी छोटी मोठी गटारं तसेच पाण्याच्या टाक्या उघड्या आहेत. उघडी गटार उघड्या
पाण्याच्या टाक्या या लहान मुलं नागरिक या पाठोपाठ आता जनावरांसाठी ही धोकादायक
बनले आहेत. यामुळे उघड्या टाक्या आणि गटारांवर झाकणे बसवावीत अशी मागणी
स्थानिकांकडून करण्यात येत आहे
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर
उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84