पुणे, दि.२० जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील गोयल गंगा
सोसायटी भागातील खाऊगल्लीत एका कचोरीच्या दुकानाला आग लागल्याने शेजारी असणाऱ्या
इतर दोन दुकानांचेही आगीत नुकसान झाले असून ही घटना मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या
सुमारास घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी सकाळी श्री गजानन शेगाव कचोरी या
माणिकबागेतील दुकानात नेहमीप्रमाणे कचोरी तयार करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी
सिलेंडर गळतीमुळे आग लागली आणि आगीने काही क्षणात बाहेर असणारे लाकडी फर्निचरला
आपल्या विळख्यात घेतले. त्यामुळे आग आणखीनच भडकली. आगीच्या गरमीमुळे गळती होत
असलेला सिलेंडरचा स्पोट झाला, आणि भडकलेल्या आगीने आसपासच्या
दुकानांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सकाळी प्रत्यक्षदर्शीनी अग्निशामक दलाला आगीची कल्पना दिली. १०
मिनिटात अग्निशामक दल पोचले व आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या
कारवाईमध्ये सिंहगड अग्निशामक दलाचे तांडेल पांडुरंग तांबे, जवान सतीश डाखले, संजू चव्हाण, संदीप पवार, जरे
यांनी आग विजवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या आगीमध्ये साई प्रेमाचा चहा, श्री गजानन शेगाव कचोरी व द बेल्जियम वॉफल या
दुकानांचे सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या पैकी द बेल्जियम वॉफल
दुकानांचे आगीत एसी, फ्रीज आदी गोष्टींचे मोठ्या प्रमाणात
नुकसान झाले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84